England vs Scotland match abandoned due to rain in Barbados T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : पावसामुळे इंग्लंड संघाला बसला मोठा धक्का! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना रद्द

England vs Scotland T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कपचा पाचवा सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात होणार होता, मात्र पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला.

Kiran Mahanavar

England vs Scotland T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपचा पाचवा सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात होणार होता, मात्र पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला. स्कॉटलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीपूर्वीच सामन्यात भरपूर पाऊस झाला.

पण नंतर स्कॉटलंड संघाने फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा सामन्याच्या सातव्या षटकात पावसाने पुन्हा खेळात व्यत्यय आणला. तोपर्यंत स्कॉटलंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता 51 धावा होती. मुसळधार पावसामुळे सामना प्रत्येकी 10-10 षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्कॉटलंड संघाने 10 षटकात विकेट न गमावता 90 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली होती. इंग्लंडकडून मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांनी 2 षटकात 11 आणि 12 धावा दिल्या. तर ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशीद यांनी एकाच षटकात 24 आणि 26 धावा दिल्या.

स्कॉटलंडच्या सलामीवीरांमध्ये जॉर्ज मुनसेने 41 धावांची तर जोन्सने 45 धावांची खेळी खेळली. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला विजयासाठी 10 षटकांत 109 धावांचे लक्ष्य होते, परंतु स्कॉटलंडचा डाव संपताच पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

स्कॉटलंडविरुद्धचा सामना पावसामुळे खेळला न गेल्याने इंग्लंडच्या पुढील प्रवासात अडचणी येऊ शकतात. इंग्लंड संघाला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे ज्यात जर तो जिंकला तर त्याचा मार्ग सुकर होईल. त्यांच्याकडून पराभूत झाल्यास इतर कोणत्याही सामन्यात पावसाने आपला खेळ बिघडू नये, अशी आशा इंग्लंडला करावी लागेल. काही उलटसुलट झाले तरी ते इंग्लंडसाठी धोक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT