Gautam Gambhir Regret: गौतम गंभीर भारतीय क्रिकेट इतिहासातील नेहमीच एक उत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने भारतीय संघाला 2007 टी20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
त्याची कारकिर्द शानदार राहिली असली, तरी मात्र त्याला एक खंत आहे, ज्याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. ही खंत 2011 वनडे वर्ल्ड कपमधील एमएस धोनीच्या प्रसिद्ध क्षणाशी निगडीत आहे.
वर्ल्ड कप 2011 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 10 चेंडू राखून पूर्ण केले होते. त्यावेळी धोनीने भारतासाठी विजयी षटकार मारला होता.
त्या सामन्यात सुरुवातीच्या विकेट्स पटापट गेल्यानंतर गंभीरने आधी विराट कोहलीला साथीला घेत भारताचा डाव सावरला होता. त्यानंतर त्याने धोनीबरोबर 109 धावांची महत्त्वाची भागीदारी केली होती. मात्र, तो 42 व्या षटकात 97 धावांवर बाद झाला होता. त्यावेळी भारताला 51 धावांची आणखी गरज होती.
पण नंतर धोनीने आक्रमक खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, त्या सामन्यात शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबून भारतासाठी सामना न संपवू शकण्याची खंत वाटत असल्याचे गंभीरने मान्य केले आहे.
तो कोलकातामधील राईज टू लीडरशीप कार्यक्रमात बोलताना म्हणाला, 'जर मी तो सामना संपवू शकलो असतो, तर. कोणावरही सामना संपवण्याची जबाबदारी सोडून देण्यापेक्षा सामना संपवणं माझी जबाबदारी होती. जर मला मागे जाऊन काही बदलण्याची संधी मिळाली, तर मी किती धावा केल्यात याची पर्वा न करता मागे जाऊन विजयी धाव घेईल.'
याशिवाय गंभीरने असेही म्हटले की त्याला दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी न मिळाल्याबद्दल निराशा वाटत नाही.
तो म्हणाला, 'मी नेहमीच चाहत्यांसाठी कामगिरी करण्याचा विचार केला आहे. मध्यंतरी मला भारतीय संघाचे 6 सामन्यांत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. नाहीतर मला हा खेद नाही, कारण मालिकांमध्ये नेतृत्व करणे हे माझे काम नव्हते.'
'माझे काम देशाला विजय मिळवून देणे आणि मी ज्या कोणत्या संघासाठी खेळत आहे, त्या संघाला विजय मिळवून देणे, हे होते.'
दरम्यान, गंभीर आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षकही होऊ शकतो. सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनच्या अखेरीस संपणार आहे. अशात बीसीसीआय आता नवा प्रशिक्षक नियुक्त करणार आहे. याच पदासाठी गंभीरला प्रबळ दावेदार समजले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.