India vs Australia T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Aus : टीम इंडिया घेणार वनडे वर्ल्ड कपचा बदला! कर्णधार रोहित आज ऑस्ट्रेलियन संघाचे करणार पॅकअप?

India vs Australia T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या टी-२० विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आव्हानाला सुरुंग लागला आहे.

Kiran Mahanavar

India vs Australia T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या टी-२० विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आव्हानाला सुरुंग लागला आहे. आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कांगारुंना भारतीय संघाला पराभूत करणे आवश्‍यक बनले आहे. टीम इंडियाविरुद्ध हारचा सामना करावा लागल्यास ऑस्ट्रेलियाचे आव्हान सुपर आठ फेरीतच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्माचा भारतीय संघ आज (ता. २४) ऑस्ट्रेलियाचा सामना करताना आपली विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी लढणार आहे. या लढतीतील टीम इंडियाच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता असून भारतीय संघ तीन विजयांसह गट एकमध्ये अव्वल स्थानावरही राहणार आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याकडे नेहमीच क्रिकेट रसिकांचे लक्ष असते. अफगाणिस्तानने रविवारी पहाटे ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्याने सोमवारच्या सामन्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, तर या गटामधून भारतासह अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. एका अर्थाने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की झाला असताना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरी गाठायला जीवाचे रान करणार आहेत. म्हणूनच सुपर आठ फेरीतील उर्वरित सामन्यांची लज्जत वाढली आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करताना सांघिक खेळ म्हणजे नक्की काय असतो याचा परिपाठ अफगाणिस्तान संघाने घालून दिला. एका सामन्याने गटातील समीकरणे बदलली. भारतीय संघाच्या हाती दोन सामन्यातील दोन मोठे विजय आहेत. म्हणजेच भारतीय संघासाठी सोमवारचा सामना जीवन-मरणाचा नाही. उलटपक्षी ऑस्ट्रेलियन संघाचे स्पर्धेतील अस्तित्व टिकवायला भारतासमोरचा सामना निर्णायक आहे. कोपऱ्यात ढकलला की कांगारूंचा संघ जोरदार पलटवार करायचा प्रयत्न करतो याची कल्पना भारतीय संघाला आहे. सोमवारच्या सामन्याला तीच धार जाणवणार आहे.

भारतीय संघाने बांगलादेशसमोर खेळताना विचारात बदल केले. फलंदाजांनी खेळाच्या सुरुवातीला धोका पत्करून मोठे फटके खेळले. वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी मोठी खेळी करण्याचा विचार सोडून आपापले योगदान दिले ज्याने धावफलकाला बळकटी आली. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळताना अगदी तशीच रणनीती भारतीय संघ वापरेल. गोलंदाजी करताना भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या आक्रमणाची धार बोथट करणारा मारा करावा लागेल. त्यासाठी धावा रोखणारी गोलंदाजी करण्यापेक्षा फलंदाजांना बाद करायची क्षमता बाळगावी लागेल.

अष्टपैलू खेळाडूंचा भरणा

ऑस्ट्रेलियन संघाची ताकद त्यांच्या अष्टपैलू गुणवत्तेत आहे. अ‍ॅडम झॅम्पा आणि जॉश हॅझलवूडचा अपवाद सोडता संघातील बाकी खेळाडू फलंदाजी चांगली करू शकतात, तसेच मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस फलंदाजीसोबत गोलंदाजी करू शकतात. तरीही गेल्या सामन्यातील पराभवाचा परिणाम ऑस्ट्रेलियन संघावर कशाप्रकारे झाला आहे, हे सोमवारीच समजेल.

सामन्याचे महत्त्व वाढले

इतर मैदानांच्या तुलनेत डेरेन सॅमी मैदानावरची खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी जास्त चांगली असते, असे समजते. रोहित शर्मा संघात बदल करेल, असे वाटत नाही. ऑस्ट्रेलियन संघात मिचेल स्टार्कचे पुनरागमन होते का हे बघावे लागेल. एकाग्र होऊन विजयासाठी झटणारा ऑस्ट्रेलियन संघ भारतासमोर सेंट लुशियाच्या डेरेन सॅमी स्टेडियमवर भिडणार आहे. कामाचा दिवस असूनही सामन्याचे महत्त्व लक्षात घेता क्रिकेट रसिक डेरेन सॅमी मैदानाकडे धाव घेणार आहेत. खूप मोठ्या संख्येत अनिवासी भारतीय क्रिकेट रसिक सेंट लुशिया बेटाकडे विमान पकडून यायला लागले आहेत. एका मोठ्या सामन्याने छोटेखानी बेटावरचे वातावरण क्रिकेटमय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT