South Africa beat Afghanistan T20 World Cup 2024  SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

SA vs AFG : 4 तास फ्लाइटला उशीर, सरावासाठी नाही वेळ... अफगाणिस्तानच्या पराभवाला ICC जबाबदार?

South Africa beat Afghanistan T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथे खेळला गेला. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 South Africa vs Afghanistan Semi-Final : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथे खेळला गेला. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. फक्त एका तासात संपूर्ण संघ 11.5 षटकांत 56 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून सामना एकतर्फी जिंकला. पण या सामन्यानंतर क्रिकेट तज्ज्ञ आणि समालोचकांनी आयसीसीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

दरम्यान इंग्लंडचा माजी महान क्रिकेटपटू मायकेल वॉनचे एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने सामना सुरू व्हायच्या आधी अफगाणिस्तान संघ दोन कारणांमुळे पराभूत होऊ शकतो असे सांगितले होते आणि तसेच घडले.

अफगाणिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी मायकेल वॉनने एक्स पोस्ट करताना लिहिले होते की, टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी अफगाणिस्तान संघ सेंट व्हिन्सेंट येथून सोमवारी रात्री उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. त्यात त्यांच्या त्रिनिदादला जाणाऱ्या विमानाला 4 तास उशीर झाला. त्यामुळे त्यांना सरावासाठी वेळ मिळाला नाही आणि नवीन जागेची सवयही झाली नाही. अशा प्रकारे त्याने नाव न घेता आयसीसीवर निशाणा साधला आहे, कारण आयसीसीने वेळापत्रक तयार केले आहे.

वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सुपर-8 मधील अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा शेवटचा चेंडू रात्री 1:09 वाजता टाकला गेला. यानंतर, अफगाणिस्तान संघाला सामन्यानंतरचे प्रेझेंटेशन सेरेमनी, उपांत्य फेरी गाठण्याचे सेलिब्रेशन, चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे सामान गोळा करण्यासाठी किमान दोन तास लागले असतील.

यानंतर टीमने हॉटेलमध्ये पोहोचून विश्रांती घेतली असावी. मग दुपारी फ्लाईट पकडायची होती, पण फ्लाइट चार तास उशिरा आली. अशा स्थितीत विमान रात्री उशिरा आल्याने त्यांना सरावासाठी वेळ मिळाला नाही. त्यात त्यांना दुसऱ्या दिवशी सामना खेळायचा होता आणि हेच संघाला चांगलेच महागात पडले.

तुम्हाला आठवत असेल की स्पर्धेच्या सुरुवातीलाही अनेक संघांनी वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले होते. अशाप्रकारे अफगाणिस्तानच्या पराभवामागे आयसीसीचे वेळापत्रक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT