T20 World Cup 2024 ICC Controversy  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : भारत, पाकिस्तानचे जास्तच लाड चालेत.... श्रीलंकेच्या संसदेत आयसीसीवर झाला पक्षपातीपणाचा आरोप

Sri Lanka Cricket Team : श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज आणि क्रीडा मंत्र्यांनी देखील आयसीसीवर तोंडसुख घेतलं.

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 ICC Controversy : यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा युएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळवला जात आहे. मात्र हा वर्ल्डकप सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आधी यंदाच्या वर्ल्डकप सामन्यांची वेळ ही भारतीय चाहत्यांचा विचार करून ठेवण्यात आली आहे असा आरोप झाला. त्यानंर सुमार खेळपट्ट्या, खराब सोयी सुविधा यामुळे आयसीसी आधीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. आता श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी आयसीसीवर भारत आणि पाकिस्तानला झुकतं माप दिल्याचा आरोप केला आहे.

श्रीलंकेने गळा काढला

आमचं वेळापत्रक अन्यायकारक असल्याचं म्हणत श्रीलंका संघाने आयसीसीवर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आम्हाला ग्रुप स्टेजचे चार सामने खेळण्यासाठी वेगवेगळ्या चार ठिकाणी प्रवास करावा लागत असल्याचं सांगितले. त्यात भरीस भर म्हणून दुसरा सामना खेळण्यासाठी त्यांना डल्लासला जाण्यासाठी तब्बल 7 तास उशीर झाला. त्यांचा दुसरा सामना हा बांगलादेशविरूद्ध होणार आहे.

दरम्यान, श्रीलंकेचे क्रीडा मंत्री फर्नांडो यांनी संसदेत सांगितले की, 'श्रीलंका क्रिकेटने आयसीसीकडे तक्रार केली आहे. वेगवेगळ्या देशांना वेगवगेळी वागणूक मिळत आहे. त्यामुळं आम्ही आयसीसी आणि टी 20 वर्ल्डकप आयोजकांकडे याचं स्पष्टीकरण मागितलं आहे.'

श्रीलंकेचा वरिष्ठ खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने देखील याबाबत आवाज उठवला आहे. त्याने सरावासाठी खराब फॅसिलिटी दिल्याचा आणि विमान प्रवासात खूप विलंब होत असल्याचा आरोप केला.

मॅथ्यूज म्हणाला की, 'सरावाच्या सोयी चांगल्या नाहीत. खेळपट्ट्या देखील चांगल्या नाहीत. गेल्या पाच दिवसातील चार दिवस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आम्हाला विमान प्रवासात उशीर झाल्यानं सराव सत्र देखील रद्द करावं लागलं.'

आम्ही ही काही कारणं देत नाहीये. आमचा संघ अडचणींवर मात करत विजयी होण्यासाठी ओळखला जातो. आता आम्ही हे सर्व मागे टाकून आमच्या पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.'

भारत - पाकिस्तान बाबत काय?

पाकिस्तानने आपले हॉटेल नासाऊ स्टेडियमच्या जवळ हलवल्याचे काल वृत्त आलं होतं. याबाबत पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी आयसीसीकडे तक्रार केली होती. दुसरीकडे भारतीय संघ आपल्या पहिल्या चार सामन्यापैकी तीन सामने हे एकाच मैदानावर खेळणार आहे. भारतीय संघाचे हॉटेल स्टेडियमपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT