England vs Scotland T20 World Cup 2024  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : गतविजेता इंग्लंड विजयी सलामीसाठी सज्ज! स्कॉटलंडकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा

Kiran Mahanavar

England vs Scotland T20 World Cup 2024 : गतविजेता इंग्लंडचा क्रिकेट संघ आज टी-२० विश्‍वकरंडकातील ‘ब’ गटातील सलामीच्या लढतीत स्कॉटलंडचा सामना करणार आहे. पहिल्या लढतीत विजय मिळवून स्पर्धेचा श्रीगणेशा शानदार करण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नशील असेल. स्कॉटलंडचा संघ मात्र सलामीच्याच लढतीत इंग्लंडला पराभवाचा धक्का देण्यासाठी सरसावला असेल.

टी-२० विश्‍वकरंडकाआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यामध्ये चार टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका टी-२० विश्‍वकरंडकाची सराव स्पर्धा म्हणून खेळवण्यात आली. मात्र यामधील दोन सामने पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानसह इंग्लंडच्या खेळाडूंनाही मनाजोगता सराव करता आला नाही. मात्र इंग्लंडच्या काही क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळून टी-२० क्रिकेटचा सराव करवून घेतला आहे.

जॉस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडने २०२२ मध्ये दुसऱ्यांदा टी-२० विश्‍वकरंडक पटकावला होता, पण त्यानंतर इंग्लंडच्या संघाला सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात इंग्लंडची सातव्या स्थानावर घसरण झाली. वेस्ट इंडीजकडून त्यांना दोन्ही प्रकारांत (एकदिवसीय व टी-२०) पराभवाला सामोरे जावे लागले.

सुखद आठवणी

इंग्लंडच्या संघाने २०१० मध्ये ब्रिजटाऊनमधील केनसिंग्टन ओव्हल या स्टेडियममध्ये पहिल्यांदा टी-२० विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया केली होती. आता यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामनाही त्याच मैदानावर होणार आहे. इंग्लंडचा संघ २०१० ची सुखद आठवण घेऊन मैदानात उतरू शकतो.

आर्चर, ब्रुककडून अपेक्षा

जॉस बटलर, सॅम करन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, फिल सॉल्ट या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधील विविध संघांमधून खेळण्याचा अनुभव मिळवला आहे. त्यामुळे टी-२० क्रिकेटचा चांगला सराव त्यांच्याकडून करण्यात आला आहे, पण इंग्लंडच्या संघात दोन खेळाडू असे आहेत, की बऱ्याच दिवसांनंतर ते क्रिकेटच्या रणांगणात उतरत आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व युवा फलंदाज हॅरी ब्रुक ही त्यांची नावे. या दोनही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता, पण टी-२० विश्‍वकरंडक देशाचे प्रतिनिधित्व करताना कस लागतो. त्यामुळे दोघांकडून आता मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातील.

पात्रता फेरीत घवघवीत यश

स्कॉटलंडचा संघ इंग्लंडच्या तुलनेत दुबळा समजला जात असला तरी जॉस बटलरच्या संघाने त्यांना कमी लेखून चालणार नाही. स्कॉटलंडच्या संघाने टी-२० विश्‍वकरंडकाच्या पात्रता फेरीतील सहाही लढतींमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला हे विशेष. या वेळी पात्रता फेरीतील घवघवीत यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी स्कॉटलंडचा संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT