Rahul Chahar and Virat Kohli  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

किंग कोहलीने राहुलकरवी काढला आपल्या सहकाऱ्याचा काटा

आयपीएलमध्ये आपल्या संघातून खेळणाऱ्या सहकाऱ्याला त्याने राहुलकरवी बाद केले.

सुशांत जाधव

India vs Australia Warm up Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात राहुल चाहरने ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मॅक्सवेलने आपल्या तोऱ्यात खेळत संघाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 व्या षटकात राहुल चाहरला त्याने रिव्हर्स स्विप फटका लगावत चार धावांची कमाई केली. या चौकारानंतर राहुलनं त्याचा खेळ खल्लास केला. मॅक्सवेलची विकेट घेण्यासाठी कोहलीचा डावपेच कामी आला. आयपीएलमध्ये आपल्या संघातून खेळणाऱ्या सहकाऱ्याला त्याने राहुलकरवी बाद केले.

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून खेळताना पाहायला मिळाले आहे. बंगळुरुकडून त्याने सर्वाधिक धावाही केल्या. या कामगिरीत सातत्य कायम राखत त्यांने ऑस्ट्रेलियासाठी दमदार खेळी केली. 28 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने त्याने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीला ब्रेक लावण्यात कोहलीने डावपेच आखल्याचे पाहायला मिळाले.

मॅक्सवेलच्या विकेटमागे विराट कोहली कसा?

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 व्या षटकात मॅक्सवेलनं राहुल चाहरचे चौकाराने स्वागत केले. त्यानंतर कोहली आणि राहुल चाहर यांच्यात चर्चा झाली. राहुल चाहरने तीन चेंडू निर्धाव टाकले. पाचव्या चेंडूवर त्याने मॅक्सवेलच्या दांड्या उडाल्या. या विकेटनंतर कोहली आणि राहुल यांच्यात झालेल्या चर्चेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी कोहलीच्या नेतृत्व गुणाचेही कौतुक करत आहेत. मॅक्सवेल हा विराटसोबत खेळला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी रणनिती कशी आखावी याचा कोहलीला चांगलाच अंदाज आल्याचे दिसते. सराव सामन्यात दिसलेली कोहलीची ही झलक आगामी स्पर्धेत टीम इंडियासाठी फायदेशीरच ठरेल.

पाकिस्तान विरुद्धच्या सलामी लढतीपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळला आणि तो जिंकलाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहली ऐवजी रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने या सामन्यात गोलंदाजी करुनही सर्वांचे लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT