Why Indians Players Are Wearing Black Armbands In Rajkot Marathi news sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ing Vs Eng : राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया काळी पट्टी घालून उतरली मैदानात, काय आहे कारण?

Why Indians Players Are Wearing Black Armbands In Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. राजकोट कसोटीदरम्यान भारतीय संघाला रविचंद्रन अश्विनच्या रूपाने मोठा फटका बसला. वैद्यकीय कारणामुळे अश्विनला सामन्यातून बाहेर जावे लागले. या भागात राजकोट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातात काळ्या पट्ट्या बांधून खेळायला आले असल्याची बातमी समोर येत आहे.

राजकोट कसोटी सामन्यात कोणाचा वरचष्मा आहे हे सांगणे आता चुकीचे आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडने सामना आपल्या ताफ्यात खेचून आणल्याचे दिसत होते. आता तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जात आहे. आज भारतीय खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

खरं तर, नुकतेच भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले. दत्ताजीराव हे भारताचे कर्णधारही होते, त्यांनी जगाचा निरोप घेतला. या कारणास्तव, आज भारताचे सर्व खेळाडू त्याच्या सन्मानार्थ काळी पट्टी बांधून खेळताना दिसतील.

या मालिकेत भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंडने मालिकेची सुरुवात विजयाने केली. यानंतर असे वाटत होते की भारतीय संघासाठी हे कठीण होणार आहे, परंतु पुढच्याच सामन्यात भारतानेही शानदार पुनरागमन केले आणि विशाखापट्टणम येथे खेळलेला कसोटी सामना जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: बायको रोजगार हमीअंतर्ग कामाला, लोक करायचे टिंगल... राजकारणात असा 'हार्ड आमदार' होणे नाही...

Maharashtra Assembly Election 2024 : नवे चेहरे, आयात उमेदवार,शिवसेना ठाकरे गट २०१९ ची पुनरावृत्ती करणार का?

Success Story: कचऱ्यातून पैसे कमवण्याचा शोधला फॉर्म्युला, अवघ्या काही वर्षात बनवली करोडोंची कंपनी

महाविकास आघाडीत 'मिरजे'वरून वाद पेटला; काँग्रेसची मोठी कोंडी, सांगली विधानसभेचा वादही पोहोचला दिल्ली दरबारी

'कभी खुशी कभी गम'च्या हेलिकॉप्टर सीनवरून नाराज होता किंग खान; कारण वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

SCROLL FOR NEXT