Virat-Kohli-Troll 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs NZ: 'कुछ तो शरम करो..'; विराटवर संतापले भारतीय फॅन्स

टीम इंडियाच्या वाईट खेळामुळे चाहते कर्णधारावर संतापले | Fans Angry on Team India

विराज भागवत

टीम इंडियाच्या वाईट खेळामुळे चाहते कर्णधारावर संतापले | Fans Angry on Team India

IND vs NZ, T20 World Cup : भारतासाठी करो या मरो सारख्या असणाऱ्या सामन्यात फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. सारे बडे खेळाडू केवळ कागदावरच हिरो ठरले. मैदानात मात्र भारताला कोणताही फलंदाज मोठी खेळी उभारू शकला नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, इशान किशन, ऋषभ पंत हे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या अष्टपैलू खेळाडूंनी थोडीशी झुंज दिल्याने भारताची अब्रू राखली गेली आणि संघाने कशीबशी शंभरी ओलांडली. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाला २० षटकात केवळ ११० धावांच करता आल्या. त्यानंतर संघाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड ट्रोल झाला.

सामन्याच्या मध्ये सुरू असणाऱ्या जाहिरातींमध्ये विराट अनेकदा दिसला. त्यावरून काहींना त्याच्यावर राग व्यक्त केला. जाहिरातींपेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्याला अनेकांनी दिला. त्याशिवाय, दिवाळीत फटाके वाजवू नका असं विराटने सल्ला दिला होता. त्यामुळे, भारतीयांनी फटाके वाजवू नये म्हणून तुम्ही सामने हारताय का असा सवालही काहींनी विचारला. पाहा त्यातील काही निवडक ट्वीट्स...

दरम्यान, आज इशान किशनला सूर्यकुमार यादवच्या जागी संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे तो लोकेश राहुलसोबत सलामीला उतरला. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. इशान किशन ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १४, लोकेश राहुल १८, विराट कोहली ९, ऋषभ पंत १२ असे सारे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा या दोघांनी काही काळ झुंज दिली. पांड्या २३ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर जाडेजाने शेवटपर्यंत पिच सांभाळत नाबाद २६ धावा केल्या. हीच भारताच्या डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. ट्रेंट बोल्टने ३, इशा सोढीने २ तर मिल्न आणि साऊदीने १-१ बळी टिपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT