क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK CWC 2023: यत्र-तत्र-सर्वत्र! पाकवर दणदणीत विजयानंतर टीम इंडियाला PM मोदींच्या खास शुभेच्छा

क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात जल्लोषाचं वातावरण असून सेलिब्रेशनही सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं खास शब्दांत अभिनंदन केलं आहे.

'यत्र-तत्र-सर्वत्र'

पंतप्रधानांनी ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंद केलं आहे. 'यत्र-तत्र-सर्वत्र' अर्थात सगळीकडे केवळ टीम इंडियाचं अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. "अहमदाबादमध्ये आज एक उत्तम, सर्वांगीण उत्कृष्ट असा विजय भारतीय संघानं मिळवला आहे. (Marathi Tajya Batmya)

यासाठी भारतीय संघाचं अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा" अशा शब्दांत पुढे पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. (Latest Marathi News)

दबावात पुनरागमन

भारतानं वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सलग आठव्यांदा पराभव केला त्यामुळं भारतासाठी ही विजयाची अष्टमी पूर्ण झाली. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् भारतीय गोलंदाजांनी बाबर सेनेची सामुहिक शिकार केली, अन् पाकिस्तानच्या संघाला 191 धावात गुंडाळलं.

भारताने आजच्या सामन्यात तीनही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. दबावात पुनरागमन कसं करायचं हे भारतीय संघाने पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपिका- रणवीरने शेअर केला लेकीचा पहिला फोटो; नावही सांगितलं, छोटंसं पण अर्थपूर्ण नाव वाचून नेटकरी करतायत कौतुक

BJP Oldest Member Dies: भाजपच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याचं निधन! PM मोदी, अमित शहांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

राज्य मंत्रिमंडळाच्या संपत्तीत लक्षणीय वाढ; जाणून घ्या कोणत्या मंत्र्याची मालमत्ता किती वाढली?

Sports Bulletin 1st November : भारताला फिरकीपटूंची साथ,पण फलंदाजांनी केला घात ते आयपीएल संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Updates: अंधेरीतील भंगार गोडाऊनला भीषण आग; आठ गाड्या घटनास्थळी

SCROLL FOR NEXT