जसप्रीत बुमराहने मोहम्मद रिझवानला बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानची अवस्था 15 षटकात 4 बाद 83 धावा अशी केली.
बाबर बाद झाल्यानंतरही उस्मान खानने रिझवानची चांगली साथ दिलेली. त्यांनी पाकिस्तानला १० षटकांच्या आतच 50 धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र त्यानंतर 11 व्या षटकात अक्षर पटेलने उस्मानला 13 धावांवर पायचीत केले. आधी अंपायरने नाबाद दिलेले, मात्र भारताने रिव्ह्युची मागणी केली, ज्यात उस्मान बाद असल्याचे दिसले.
मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात दिली होती. पण भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 व्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला 13 धावांवर बाद केले. आझमचा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने जमीनीलगत घेतला.
पाकिस्तानने पहिल्यांदाच टी 20 मध्ये भारताला ऑल आऊट केलं. भारताचा डाव 19 षटकात 119 धावांवर संपला.
भारताने 10 षटकात 3 बाद 89 धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र भारताचा डाव घसरला. पुढच्या चार विकेट भारताने 7 धावात गमावल्या. भारताची अवस्था 14.2 षटकात 7 बाद 96 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानने अखेर भारताची 31 धावांची भागीदारी अखेर हारिस रौऊफने फोडली. त्यानं 8 चेंडूत 7 धावा करणाऱ्या सूर्याला बाद केले. भारताने 12 षटकात 4 बाद 90 धावा केल्या.
भारताने अक्षर पटेलच्या रूपाने तिसरी विकेट पडली. अक्षरने 20 धावा केल्या. त्यानंतर पंतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली अन् संघाला 9 षटकात 3 बाद 68 धावांपर्यंत पोहचवलं.
अनेक जीवनदान मिळालेल्या ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी करत भारताला 6 षटकात 50 धावा करून दिल्या.
शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला 13 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.
पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. विराट कोहलीने चौकार मारत दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर तो लगेचच झेलबाद झाला. भारताच्या 2 षटकात 1 बाद 19 धावा झाल्या आहेत.
शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्या षटकात रोहित शर्माने षटकारासह 8 धावा वसूल केल्या. मात्र त्यानंतर लगेच पाऊस आल्यानं पुन्हा खेळ थांबवण्यात आला आहे.
सध्या जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मैदानावरील कव्हर्स पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत. अजून न्यूयॉर्कवर ढग दाटले असून कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नासाऊची खेळपट्टी ही गोलंदाजांना पोषक असते. त्यामुळे भारताला पॉवर प्लेमध्ये सांभाळून खेळावं लागणार आहे.
पावसाने उसंत घेतली असून मैदानावरील कव्हर्स काढण्यात आले आहेत. नाणेफेक 8 वाजता होणार असून सामना 8.30 ला सुरू होईल.
भारत - पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने नाणेफेकीला उशीर होत आहे. पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र मैदान अजून ओलं आहे. दोन्ही संघ वॉर्म अप करत आहेत.
सामन्याला अजून जवळपास एक तास शिल्लक असतानाच न्यूयॉर्कमध्ये पाऊस सुरू झाला आहे.
न्यूयॉर्कमधून आज पहिला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दाट काळे ढग दिसत आहेत. याचा अर्थ या हाय-व्होल्टेज सामन्यात पाऊस पडू शकतो. हवामानाच्या अंदाजानुसार, न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10 वाजता पावसाची 61 टक्के शक्यता आहे. यासोबतच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. वादळाचीही शक्यता आहे.
वेगवान गोलंदाजीसाठी योग्य असलेल्या या खेळपट्टीवर कुलदीपला संघात घेण्याऐवजी अक्षरमध्ये अतिरिक्त फलंदाज घेऊन खेळणे संघासाठी उपयुक्त ठरू शकते. आणि माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही संघात अक्षरला प्राधान्य देण्याची वकिली केली आहे.
सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा स्फोटक फलंदाज सरावादरम्यान जखमी झाल्याची बातमी आहे. एक दिवसापूर्वी, रोहित शर्माबद्दल बातमी आली होती की तो नेटमध्ये सराव करताना जखमी झाला होता, तरीही त्याने पुन्हा सराव सुरू केला होता.
आता ऋषभ पंतच्या दुखापतीची बातमी येत आहे. पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतला दुखापत झाल्याचे दिसून येत आहे आणि यासोबतच पंतही वेदनेने ओरडताना दिसला. पंत मस्करी करत होता की खरोखर जखमी झाला होता हे सुरू झाल्यावर सांगता येईल.
Accuweather च्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात तापमान 20 अंशांच्या आसपास राहील, परंतु सामना सकाळी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल तेव्हा ढगाळ वातावरण असेल. सामन्याच्या पहिल्या डावात पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. असे झाले तर चाहत्यांची मुड खराब होईल.
जर तुम्हाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना टेलिव्हिजनवर पाहायचा असेल तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. याशिवाय, जर तुम्हाला या सामन्याचा विनामूल्य आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. यासाठी हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
खरे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाच नाही तर वर्ल्ड कपमधील सर्व सामने डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येतील.
न्यूयॉर्कची खेळपट्टी पाहता अनेक दिग्गज भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल सुचवत आहेत. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर मोठे शॉट्स खेळता येत नाहीत. अशा परिस्थितीत भारताने शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे, ज्याला दबाव असताना सिंगल-डबल घेत डाव कसा पुढे घेऊन जायचा हे माहीत आहे.
भारत आणि पाकिस्तानने आपापसात एकूण 12 टी-20 सामने खेळले आहेत. भारताने 9 सामने जिंकले असून पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोघेही सात वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात भारताने सात सामने जिंकले तर पाकिस्तानने एक सामना जिंकला.
T20 World Cup 2024 India vs Pakistan Live Score : भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत ग्रुप स्टेजमधील आपला दुसरा विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानसमोर फक्त 120 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावांपर्यंतच मजल मारता आली. जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तर ऋषभ पंतने 41 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
पाकिस्तानच्या या पराभवामुळं त्यांच सुपर 8 मध्ये स्थान मिळवणं जवळपास मुश्किल झालं आहे. जर युएसएने आयर्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचं ग्रुप स्टेजमधूनच पॅक अप होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने भारताचा डाव 119 धावात गुंडाळला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हारिस राऊफने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यांना मोहम्मद आमिरने दोन आणि शाहीनने एक विकेट घेत चागंली साथ दिली.
भारताकडून ऋषभ पंतने 42 धावांची खेळी केली. त्याला अनेक जीवनदान मिळाले. त्यानंतर अक्षर पटेलने 20 आणि रोहित शर्माने 13 धावा केल्या. भारताच्या फक्त या तीन फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.