T20 World Cup Final Match 2024 Suryakumar Yadav Catch Turning Point sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Suryakumar Yadav Catch Video : हरलोच होतो पण... सूर्याने केला कपिलसारखा चमत्कार, एक कॅच ठरला वर्ल्ड कपचा 'टर्निंग पॉईंट'

T20 World Cup Final Match 2024 Turning Point : कोट्यवधी भारतीयांच्या प्रार्थनांना अखेर फळ मिळाले आणि टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी शानदार विजय नोंदवत वर्ल्ड कप जिंकला.

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav Catch Turning Point Video : कोट्यवधी भारतीयांच्या प्रार्थनांना अखेर फळ मिळाले आणि टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी शानदार विजय नोंदवत वर्ल्ड कप जिंकला.

अखेर 10 वर्षांनंतर टीम इंडियाने फायनल जिंकून जगातील नंबर 1 टीम असल्याचे सिद्ध केले. या सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली असली तरी या विजयात मोठा वाटा सूर्यकुमार यादवचा होता. त्याने 20व्या षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूवर सीमारेषेवर घेतलेला डेव्हिड मिलरचा आश्चर्यकारक झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

सूर्यकुमार यादवच्या या झेलमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला आणि त्यानंतर हार्दिकने पुन्हा संधी दिली नाही. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती, परंतु हार्दिक पांड्याने केवळ 9 धावा दिल्याने भारताने सामना 7 धावांनी जिंकला.

भारताने 17 वर्षांनंतर जिंकली ट्रॉफी

टीम इंडिया तिसऱ्यांदा आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर 2014 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आता 17 वर्षांनंतर टीम इंडियाने फायनलमध्ये आपला झेंडा फडकावला आणि विजेतेपद पटकावले.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 विकेट्सवर केवळ 169 धावा करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT