Rohit Sharma Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma Retirement: विराटपाठोपाठ रोहित शर्माचाही T20I क्रिकेटला अलविदा! वर्ल्ड कप जिंकत केली निवृत्तीची घोषणा

Rohit Sharma T20I Retirement: रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Pranali Kodre

Rohit Sharma T20I Retirement: भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात २९ जून हे नाव आता सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. याच दिवशी भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली. पण हा वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानेही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

भारताने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी पराभूत केले आणि हे विजेतेपद जिंकले. हा सामना रोहित आणि विराट यांच्या कारकिर्दीतील भारतासाठी खेळलेला अखेरचा टी२० सामना ठरला.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.

तो पत्रकार परिषदेत म्हणाला, 'विराटप्रमाणेच माझाही हा शेवटचा टी२० सामना होता. मी या प्रकारात खेळायला लागल्यापासून त्याचा आनंद घेतला आहे. यापेक्षा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला गुडबाय म्हणण्यासाठी योग्य वेळ कोणतीच नसेल. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. माझी खूप मनापासून वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा होती. आम्ही आत तो जिंकला, याबद्दल आनंद आहे.'

याशिवाय रोहितन टी२० वर्ल्ड कप विजेतेपद भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला समर्पित केले. राहुल द्रविडचाही हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता.

रोहित म्हणाला, 'त्याने जे भारतीय क्रिकेटसाठी गेल्या २०-२५ वर्षात केले आहे, त्यानंतर फक्त इतकाच विजय बाकी होता. मी माझ्या संघाच्यावतीनं त्याच्यासाठी हे विजेतेपद जिंकू शकलो, याबद्दल आनंद व्यक्त करतो.'

याशिवाय रोहितने सर्व संघसहकाऱ्यांचेही कौतुक केले. तसेच त्यांचे आभारही मानले.

याशिवाय हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे सांगताना रोहित म्हणाला, 'हा खरंतर सर्वोत्तम क्षण आहे. मी असं आता म्हणू शकतो. कारण खरंतर मला वर्ल्ड कप मनापासून जिंकायचा होता.'

'मी ज्या धावा इतक्या वर्षात केल्या त्याचे महत्त्व आहेत, पण मी आकडेवारीचा फार मोठा चाहता नाही. माझ्यासाठी भारतासाठी सामने जिंकणे, ट्रॉफी जिंकणे सर्वात महत्त्वाचे आहे, हाच विचार पुढेही असेल.'

रोहित सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामन्यांमध्ये ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT