T20 World Cup 2024, India vs Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 मधील भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळवला जाणार आहे. गुरुवारी (20 जून) हा सामना होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.00 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
भारताने यापूर्वी पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत खेळले होते. न्युयॉर्कमधील मैदानात अनियमित उसळी होती, ज्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा झाला होता. मात्र आता भारताच्या सुपर-8 मधील सामने कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत.
तिथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळताना दिसून आली आहे. त्याचमुळे भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात बदल करणार का, याबाबत भारतचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने माहिती दिली आहे.
द्रविड म्हणाला, 'कोणालाही बाहेर ठेवणे कठीण आहे. ज्या चार खेळाडूंना आम्ही बाहेर ठेवले होते, ते सर्वच प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही संघात येऊ शकते. जर तुम्ही पाहिले, तर बदली खेळाडू आले, तरी संघ कमजोर होणार नाही.'
'आम्ही परिस्थिती आणि त्या ठिकाणी जे योग्य वाटेल, त्या संयोजनासह मैदानात उतरलो. आम्हाला तेव्हा वाटले की फिरकी गोलंदाजांची भूमिकेपेक्षा तिकडे वेगवान गोलंदाजी जास्त फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर त्या कठीण खेळपट्ट्यांवर आमच्या फलंदाजीत सखोलता राहिले, याचीही आम्ही काळजी घेतली होती.'
तसेच द्रविड वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याबद्दल म्हणाला, 'इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. आम्हाला कदाचीत एखाद्या जादाच्या फिरकीपटूची गरज पडू शकते.'
'कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहलसारखे खेळाडू संघात येऊ शकता. त्यांचे कौशल्य संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतो. आमची अशीच विचारशैली असणार आहे कारण प्रत्येक बेटावर वेगवेगळी परिस्थिती असू शकते.'
याशिवाय द्रविडने असेही सांगितले की फलंदाजी क्रमवारीत लवचिकता राहिल. सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीतील क्रमवारीत बदल केला जाऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.