India vs Bangladesh Hourly Weather Update Will Rain Play Spoilsport In T20 World Cup 2024 Super 8 Match sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Ban Weather Update : भारत-बांगलादेश सामना पावसामुळे जाणार वाहून? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Hourly Weather Update T20 World Cup 2024 : तीन दिवसांत सलग दुसरा सामना जिंकून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची थेट उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी भारताला आज मिळणार आहे; पण त्यासाठी धोकादायक बांगलादेशचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. बांगलादेशचा संघ सुपर आठ फेरीत सलग दुसऱ्या दिवशी दुसरा सामना खेळणार आहे.

भारत-बांगलादेश सामन्याला नेहमीच वेगळी किनार असते. १७ वर्षांपूर्वी याच वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पराभव केला होता आणि त्यामुळे पुढे जाऊन भारतीयांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.

तेव्हापासून बांगलादेशचा संघात भारताविरुद्ध खेळताना नेहमीच खुमखुमी असते. भारतीय संघाला पराभूत करू शकतो, असे त्यांना नेहमीच वाटत असते. परिणामी रोहित सेनेला सावध राहावे लागणार आहे.

तसे बघायला गेले तर बांगलादेश संघाने आयसीसीचा भरपूर पाठिंबा मिळून आणि वेळोवेळी संधी मिळून खेळात अपेक्षित प्रगती करून दाखवलेली नाही. बांगलादेश संघाच्या खेळात सातत्य नाही; तरीही त्यांचे पत्रकार आणि खेळाडू प्रत्येक सामना आमचाच संघ आरामात जिंकेल, या थाटात वावरताना दिसतात.

अर्थातच बांगलादेश संघात काही अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांच्या खेळात गुणवत्ता डोकावते. लिटन दास, तन्झीन हसन आणि हृदोय चांगले आक्रमक फलंदाज आहेत. अनुभवी शकीब बरोबर महमुदुल्ला आणि मेहदी हसन या अष्टपैलू खेळाडूंची साथ आहे. मुस्तफिजूरसारखा टी२० क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला गोलंदाज बांगलादेश संघात आहे. भारतीय संघाला या बलस्थानांची कल्पना आहे.

बांगलादेशसमोरच्या सामन्यात भारतीय संघ डावाच्या सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करायचा प्रयत्न करेल, असे समजले आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतरही सलामीच्या अपयशाचा मुद्दा चर्चेला आलाच होता. बांगलादेशसमोर रोहित आणि विराट थोडा धोका पत्करून मोठे फटके मारायचा खेळ करतील, अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे. फलंदाजांना १८०चा धावफलक उभारता आला, तर भारतीय गोलंदाजांच्यात असलेली क्षमता संघाला विजयाकडे नेऊ शकते, असा विश्वास आहे.

तिकिटे शिल्लक

भारताचा एकमेव सामना अँटीगाला होत असूनही लढतीची सर्व तिकिटे विकली गेली नाहीयेत. अनिवासी भारतीयांच्या क्रिकेटप्रेमामुळे मैदान थोडेतरी रंगते आहे. अँटिगाचे स्थानिक लोक भारतीय संघाचा खेळ अनुभवायला सर व्हिव्हियन रिचर्डस् मैदानावर जमा होतात का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

पावसाची शक्यता कमी

याच मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेशदरम्यानच्या गेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने सामन्यातील षटके कमी करावी लागली होती. भारतीय संघाच्या सामन्यात शनिवारी सकाळी मैदानावर थोडे ढग दिसले, तरी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT