T20 World Cup 2024 IND vs BAN ESAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN T20 WC 2024 : अपराजीत! कुलदीप यादवनं बांगलादेशला नाचवलं; भारताने ग्रुप 1 मध्ये केलं टॉप

T20 World Cup 2024 : भारताने बांगलादेशचा पराभव करत सुपर 8 मधील आपला दुसरा सामना जिंकला. भारत यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अपराजीत राहिला आहे.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Bangladesh T20 World Cup 2024 : भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. 

भारताने विजयासाठी 197 धावांचे आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने सामना 50 धावांनी जिंकला. भारत आता सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला आहे.

बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 145 धावांपर्यंतच मजल मारता आली. कुलदीपने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. हार्दिकने देखील एक एक विकेट घेत चांगला मारा केला. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शन्तोने सर्वाधिक 40 धावा केल्या.

भारताने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आक्रमक शैलीत सुरूवात केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 3 षटकात 39 धावा केल्या. मात्र त्यानंतर रोहित शर्मा 10 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली देखील 37 धावांवर बाद झाला. सूर्याही आल्या आल्या एक षटकार मारून माघारी फिरला. भारताची अवस्था 3 बाद 77 धावा अशी झाली. यानंतर ऋषभ पंतने भारताला शतकी मजल मारून दिली. मात्र तोही 36 धावा करून बाद झाला.

पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला शिवम दुबेने 34 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. दुबे बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने 27 चेंडूत नाबाद 50 धावा करत भारताला 196 धावांपर्यंत पोहचवले.

IND vs BAN T20 WC 2024 : अपराजीत! कुलदीप यादवनं बांगलादेशला नाचवलं; भारताने ग्रुप 1 मध्ये केलं टॉप

भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव करत सुपर 8 चा दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं.

IND vs BAN T20 WC 2024 Live : कुलदीप यादवनं बांगलादेशला नाचवलं; भारता ग्रुपमध्ये टॉप करण्याच्या उंबरठ्यावर

कुलदीप यादवनं आपल्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगनं देखील विकेट्स घेत बांगलादेशची अवस्था 16 षटकात 6 बाद 110 धावा अशी झाली होती.

IND vs BAN T20 WC 2024 Live : कुलदीप यादवने दिला दुसरा धक्का; बांगलादेश बॅकफूटवर

कुलदीप यादवने बांगलादेशला दोन धक्के देत त्यांना बॅकफूटवर ढकललं. यामुळे बांगलादेशच्या 12 षटकात 3 बाद 80 धावा झाल्या.

IND vs BAN T20 WC 2024 Live : बांगलादेशचेही चोख प्रत्युत्तर, मात्र भारतानेही दिले दोन धक्के

भारताच्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशने 10 षटकात 67 धावा केल्या. मात्र हार्दिकने लिटन दासला 13 धावांवर तर कुलदीप यादवने तनझीद हसनला 29 धावांवर बाद करत दोन धक्के दिले.

IND vs BAN T20 WC 2024 Live : हार्दिक पांड्याचे अर्धशतक; भारताने बांगलादेशसमोर ठेवलं 196 धावांचं आव्हान

हार्दिक पांड्याने 27 चेंडूत नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला 20 षटकात 5 बाद 196 धावांपर्यंत पोहचवलं.

IND vs BAN T20 WC 2024 Live : हार्दिक पांड्या अन् दुबेने गिअर बदलला; भारत 150 पार

हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत भारताला 150 धावांच्या पार करून दिल्या. त्याने शिवम दुबेच्या साथाने तुफान फटकेबाजी केली. शिवमने देखील फटकेबाजी करत 24 चेडूत 34 धावा केल्या.

IND vs BAN T20 WC 2024 Live : भारताच्या पडझडीनंतर पंतने सूत्रे घेतली हातात; भारताचे शतक लावले धावफलकावर

ऋषभ पंतने 23 चेंडूत 36 धावा करत भारताला 12 व्या षटकात भारताला शतकी मजल मारून दिली. मात्र तो रिव्हर्स स्विप मारण्याच्या नादात तो राशिद हुसैनला विकेट दिली. भारताच्या 12 षटकात 4 बाद 112 धावा झाल्या आहेत.

IND vs BAN T20 WC 2024 Live : चांगल्या सुरूवातीनंतर भारताची अवस्था बिकट; विराट पाठोपाठ सूर्याही बाद

बांगलादेशने भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. तंझीमने विराट कोहलीचा त्रिफळा उडवल्यानंतर सूर्यकुमारला देखील 6 धावांवर बाद केले. भारताच्या 9 षटकात 3 बाद 80 धावा झाल्या होत्या.

IND vs BAN T20 WC 2024 Live : विराट कोहलीने गिअर बदलला; पंतचाही दांडपट्टा

रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी भारताला 8 षटकात 71 धावा केल्या. मात्र पुढच्याच षटकात तंझीमने त्याचा 36 धावांवर त्रिफळा उडवला.

IND vs BAN T20 WC 2024 Live : भारताला पहिला धक्का; आक्रमक रोहित शर्मा झाला बाद

रोहित शर्माने 10 चेंडूत 23 धावा करत भारताला दमदार सुरूवात करून दिली. मात्र तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. भारताच्या 5 षटकात 1 बाद 42 धावा केल्या.

रोहितला हवं होतं तेच झालं!

रोहित शर्माने नाणेफेकीनंतर आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार होतो असं सांगितलं. रोहितने आपल्या संघात एकही बदल न करता विनिंग कॉम्बिनेशनला हात न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs BAN T20 WC 2024 Live : बांगलादेशने नाणेफेक जिंकली

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा कमी धावसंख्येत रोखण्याचा मानस नजमुलनं बोलून दाखवला आहे. बांगलादेशने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी टस्किन हा खेळणार नाहीये.

 IND vs BAN : हेड टू हेड 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी 20 क्रिकेटमधील स्कोअर हा 12-1 असा आहे. भारताने 12 तर बांगलादेशने 1 सामना जिंकला आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत - बांगलादेश 4 वेळा आमने सामने आले होते. त्यातील एकदाही बांगलादेशला भारताला मात देता आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT