India vs Pakistan New York Weather : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आता एका दिवसापेक्षा कमी वेळ राहिला आहे. खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनाच या सामन्याची प्रतीक्षा आहे.
न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील 19 वा सामना आहे, जो रविवार 09 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात खेळपट्टीव्यतिरिक्त हवामानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मात्र, पावसामुळे या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो आणि सामन्याची मजा खराब होऊ शकते. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की मॅच दरम्यान पाऊस पडू शकतो.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात चांगली केली आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाने मोठा विजय मिळवला, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता दोन्ही संघ 9 जूनला एकमेकांशी भिडणार आहेत.
मात्र, या सामन्यात पावसाचा धोका आहे. AccuWeather नुसार, 41 टक्के पाऊस अपेक्षित आहे, त्यानंतर तो 40 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. आता सामन्यात पाऊस पडतो की नाही हे पाहायचे आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये साखळी सामन्यांसाठी आयसीसीने कोणताही राखीव दिवस ठेवला नाही. म्हणजे सामनाच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी खेळता येणार नाही आणि सामना रद्द केला जाईल. यासोबत दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. असे झाल्यास पाकिस्तानला नुकसान सहन करावे लागू शकते.
आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानवर पूर्णपणे वरचढ ठरला आहे. पाकिस्तान संघाला आतापर्यंत फक्त एकदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव केला. तो पण 2021 मध्ये.
मात्र, याशिवाय त्यांना इतरही कोणत्याही टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव करता आला नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा टीम इंडियाची नजर पाकिस्तानविरुद्धच्या विजयावर असेल. यावेळी टीम इंडियाचा आत्मविश्वास खूप उंचावला असेल, कारण पहिल्याच सामन्यात त्यांनी जबरदस्त विजय मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.