IND vs PAK T20 WC 24  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK T20 WC 24 : एका सेकंदाला तब्बल 4 लाख रूपये! भारत - पाक सामन्यापूर्वी कशाचा दर एवढा गगनाला भिडलाय?

IND vs PAK T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटापासून पार्किंगपर्यंत सर्व गोष्टींचे दर हे गगनाला भिडले आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रिज प्रचंड आहे. त्यामुळेच या सामन्यादरम्यान जाहिरातीच्या स्लॉटचे दर गगनाला भिडले आहेत. अंदाजे जाहिरातदारांना सामन्यादरम्यान जाहिरात देण्यासाठी एका सेकंदाचे तब्बल 4 लाख रूपये मोजावे लागणार आहेत.

भारत - पाकिस्तान हा सामना हाय व्होल्टेज असतो. युएसमध्ये हा सामना पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या लोकांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे. त्यात युएसएनं पाकिस्तानला मात दिल्यामुळं तर भारत - पाकिस्तान सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

याचा फायदा उचलण्यासाठी आता सामन्यादरम्यान झळकणाऱ्या जाहिरातींचे दरही वाढवण्यात आले आहेत. या व्यवसायातील तज्ज्ञ संतोष एन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी जवळपास 40 लाख रूपये मोजावे लागत आहेत.

भारताच्या सामन्यावेळी सहसा 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी जवळपास 20 लाख रूपये आकारण्यात येत आहेत.

सुपर बॉऊलमध्ये सामन्यादरम्यान 30 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 6.5 मिलियन डॉलर आकारले जातात. 2022 मध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप सामन्यादरम्यान, 30 सेकंदाच्या जाहिरातीसाठी जवळपास 4 लाख पाऊंड आकारले जात होते.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी इमिरेट्स, सौदी अरामको आणि कोका कोला हे मोठे स्पॉन्सर आहेत. ते भारत पाकिस्तान सामन्यात मोठा नफा कमवण्याच्या तयारीत आहेत.

यामुळेच दक्षिण आशियामधील व्ह्युवरशिप पाहून भारत - पाकिस्तान सामन्याची वेळ ठरवण्यात आली होती.

आयसीसीने यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा युएसएमध्ये ठेवण्यामागे क्रिकेटचा जगभरात प्रसार करण्याचा उद्येश आहे. याचबरोबर 2028 मध्ये लॉस एन्जल्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपचा उपयोग होऊ शकतो.

युएसमधील टेक लिडर देत आहेत क्रिकेटला पाठिंबा

अमेरिकेतील टेक लिडर संदर पिचेई, सत्या नाडेला आणि शंतनु नारायण यांनी मेजर क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. यामुळे अमेरिकेत क्रिकेटचे संभाव्य मार्केट मोठं असल्याचं दिसत आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT