T20 World Cup 2024 Final Weather esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs RSA T20 WC 24 Final : भारत - दक्षिण आफ्रिका फायनल सामन्यात पडणार पाऊस; कसे असतील राखीव दिवसाचे नियम?

T20 World Cup 2024 Final Weather : भारत - दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्डकप फायनल सामन्यावरही आहे पावसाचे सावट. आयसीसीने राखीव दिवसाची तरतूद केली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

IND vs RSA T20 WC 24 Reserve Day Rule : भारताने इंग्लंडविरूद्धचा टी 20 वर्ल्डकप 2024 चा सेमी फायनल सामना 68 धावांनी जिंकत फायनल गाठली. आता शनिवारी 29 जूनला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत विजेतेपदसाठी भिडणार आहे.

भारत - इंग्लंड सेमी फायनलवर पावसाचे सावट होते. त्यामुळे हा सामना ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ लांबला. त्यात या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला नव्हता. त्यामुळे ग्रुप स्टेज आणि सुपर 8 मधील स्थानावरून फायनल कोणता संघ खेळणार हे ठरवावे लागले असते. मात्र सुदैवाने पावसाच्या लपंडावातही सामना पूर्ण झाला अन् भारताने सामना जिंकून अंतिम फेरी गाठली.

दुसरीकडं बार्बाडोसमध्ये होणाऱ्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. मात्र या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद आयसीसीने केली आहे. पाहुयात टी 20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलासीठीच्या राखीव दिवसाचे काय नियम आहे.

1 - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर 29 जूनला पाऊस झाला तर 30 जूनला फायनल खेळवण्यात येईल.

2 - पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 10 षटके खेळणे आवश्यक आहे. जर 10-10 षटकांचा सामना झाला नाही तर सामना राखीव दिवशी पुढे खेळला जाईल.

3 - फायनल सामन्यासाठी अतिरिक्त वेळ देखील दिला आहे. जवळपास 3 तास 10 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला आहे. अतिरिक्त वेळेत देखील सामन्याचा निकाल लागला नाही तर राखीव दिवशी सामना खेळला जाईल.

4 - सामना हा त्याच दिवशी खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मग तो 10 - 10 षटकांचा सामना का असेना. जर सामना 10 - 10 षटकांचा देखील होणार नसेल तर सामना राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो.

5 - जर षटकांची संख्या घटवावी लागली तर अन् सामना त्या दिवशी पूर्ण झाला नाही तर राखीव दिवशी सामना त्याच स्थितीतून पुढे खेळला जाईल.

6 - जर एखादा संघ 9 षटकापर्यंत सामना खेळतो. त्यानंतर पाऊस आला आणि सामना प्रत्येकी 17 षटकांचा करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसामुळे त्या दिवशी सामना झाला नाही (एकही चेंडू न खेळता) तर राखीव दिवशी सामना प्रत्येकी 17 नाही तर 20 षटकांचा होईल. जर राखीव दिवशी देखील पाऊस आला तर षटकांची संख्या पुन्हा घटवण्यात येईल.

7 - याच संदर्भात दुसरा नियम आहे की जर एखादा संघ 9 षटकापर्यंत सामना खेळतो. त्यानंतर पाऊस आला अन् सामना प्रत्येकी 17 षटकांचा झाला. षटके कमी केल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला अन् एक षटक खेळल्यानंतर पुन्हा पाऊस आला. या पावसामुळं जर सामना त्या दिवशी होऊ शकला नाही तर राखीव दिवशी सामना ज्या स्थितीत थांबला होता तिथूनच सुरू होईल. कारण सामन्यातील षटके घटवण्यात आल्यानंतर एका षटकाचा खेळ झाला होता.

8 - जर राखीव दिवशी देखील सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेतेपद देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT