India vs South Africa Final sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA : टी-20 मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका संघ किती वेळा भिडले? अंतिम सामन्यापूर्वी पहा हे आकडे

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup 2024 Final : टी-20 वर्ल्ड कप भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन अजिंक्य संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. शनिवारी 29 जून रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारत 17 वर्षांनंतर दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या विजेतेपदाच्या शोधात आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे लक्ष पहिल्या विजेतेपदावर आहे. अशा स्थितीत चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक सामन्याच्या पूर्ण अपेक्षा आहेत.

भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून दहा वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चौथ्या आयसीसी वर्ल्ड कप विजेतेपदापासून एक विजय दूर आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत

- एकूण सामने ६

- भारत विजय ४ ः आफ्रिका विजय २

- सर्वोच्च धावसंख्या १८६ ः १७२

- नीचांकी धावसंख्या ११८ ः ११६

- कोणत्याही विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि आफ्रिका अंतिम सामन्यात प्रथमच आमनेसामने

- २०१४ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध लढत. त्या सामन्यात भारताचा विजय

- यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघ अपराजित.

- दोन्ही संघ साखळी आणि सुपर-आठ गटात अव्वल.

- जो संघ विजेता होईल तो टी-२० विश्वकरंडक अपराजित राहून जिंकेल, असा विक्रम प्रथमच होईल.

- भारताचे प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय

- आफ्रिकेचे काही सामन्यांत निसटते विजय

- नेपाळविरुद्धचा सामना तर एका धावेने जिंकला

- सुपर-आठ फेरीत विंडीजविरुद्ध सामना जिंकला नसता तर आव्हान संपुष्टात आले असते

- आफ्रिकेने १९९८ मधील पहिल्यावहिल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र विश्वकरंडक जिंकण्यात अपयश

- द. आफ्रिकेकडून १९९२, १९९, २००७, २०१५ आणि २०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धांची उपांत्य फेरीपर्यंत मजल

- टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत २००८ आणि २०१४ मध्ये द. आफ्रिका उपांत्य फेरीत, पण यंदा प्रथमच अंतिम फेरीत दाखल

- २०११ एकदिवसीय विश्वकरंडक आणि २०१३ मधील चॅम्पियन्स करंडक विजेतेपदानंतर भारताला एकही मोठे यश नाही

- २०१४ ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान

- २०१६ आणि २०२२ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidansabha: हरियाणा नंतर आता राष्ट्रीय पक्षांचे 'मिशन महाराष्ट्र'; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी करणार दौरे

Bajaj Housing Finance: बजाज हाउसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होणार; ब्रोकरेजने वर्तवला अंदाज

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT