Mohammad Hafeez esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Mohammad Hafeez : भारतातील वर्ल्डकपमध्ये बाबरसह आर्थर यांचे तंदुरुस्तीला दुय्यम स्थान; पाक संघाचे माजी संचालक हाफिज यांचा आरोप

पाकिस्तान क्रिकेटचे माजी संचालक मोहम्मद हफिज यांनी संघाला घरचा आहेर दिला आहे.

पीटीआय

कराची - पाकिस्तान क्रिकेटचे माजी संचालक मोहम्मद हफिज यांनी संघाला घरचा आहेर दिला आहे. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत कर्णधार बाबर आझम आणि प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी संघाच्या तंदुरुस्तीला सर्वात दुय्यम स्थान दिले, असा आरोप त्यांनी केला आहे.

भारतातील या विश्वकरंडक स्पर्धेत मोठ्या अपेक्षा बाळगलेल्या पाकिस्तानला नऊ साखळी सामन्यांपेकी पाचच सामने जिंकता आले. त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत संघाची सुमार कामगिरी झाल्यानंतर पाक मंडळाने हाफिज यांची संघ संचालक म्हणून नियुक्ती केली होती; परंतु ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यातही पाकचा संघ अपयशी ठरल्यानंतर हाफिज यांचा करार वाढवण्यास पाक मंडळाने नकार दिला. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत पाक संघाला व्हाईटवॉश स्वीकारावा लागला तर न्यूझीलंडमधील टी-२० मालिका त्यांनी १-४ अशी गमावली.

हाफिज म्हणतात, २०२३ च्या अखेरीस मी संघ संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आणि आम्ही लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो तेथे सर्व खेळाडूंचा तंदुरुस्ती अहवाल संघाच्या ट्रेनरला देण्यास सांगितला होता. ज्याद्वारे मला तंदुरुस्तीचा स्तर उंचवायचा होता; परंतु ट्रेनरने दिलेली माहिती धक्कादायक होती. तंदुरुस्ती प्राधान्याची नाही. खेळाडूंना जसे खेळायचे आहे तसे खेळू द्या, असे बाबर आणि आर्थर यांनी आपल्याला सहा महिन्यांपूर्वीच सांगितल्याचे हा ट्रेनर म्हणाला.

ट्रेनर यांनी दिलेली ही माहिती माझ्यासाठी धक्कादायक होती. सहा महिन्यांपासून खेळाडूंच्या तंदुरुस्तीची दखलच घेतली नव्हती. मी प्रत्येक खेळांमध्ये असलेल्या चरबीचे आणि सहनशक्ती तपासली, ती निच्चांकी स्तरावर होती, असे हाफीज यांनी सांगितले.

सध्या युगात तिन्ही प्रकारात तंदुरुस्ती सर्वात महत्त्वाची असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही खेळाडूंचा दमसास तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे खेळाडू दोन किलोमीटर अंतरही पूर्ण करू शकत नव्हते, असाही आरोप हाफिज यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT