Harbhajan Singh on Kamran Akmal News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

'शिखांनी तुमच्या आया-बहिणींना वाचवलंय...' पाकिस्तान खेळाडूच्या 'त्या' जोकवर हरभजनचा फिरला दांडपट्टा, मागावी लागली माफी

Kiran Mahanavar

Harbhajan Singh on Kamran Akmal News : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्याची चर्चा सुरू असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने अर्शदीप सिंगसह शीख समुदायाची खिल्ली उडवली, त्यानंतर हरभजन सिंग त्याच्यावर चांगलाच संतापला.

खरंतर भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. त्यावेळी अर्शदीप सिंगने गोलंदाजीची जबाबदारी घेतली. अर्शदीप गोलंदाजी करत असताना कामरान अकमल पाकिस्तानच्या एका न्यूजमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा करत होता. यावेळी त्याने अर्शदीप सिंग आणि शीख समुदायाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली.

व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसत आहे. बघा, अर्शदीप सिंगला शेवटची ओव्हर करायची आहे. काहीही होऊ शकते कारण... बारा वाजले आहेत. यानंतर तो जोरजोरात हसताना दिसत आहे. तो तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांसोबत हसतो.

हरभजन सिंगने खडसावले

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने कामरान अकमलच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. यावर हरभजन सिंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले, 'लाज वाटली पाहिजे कामरान अकमल. घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले, जेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले होते, तेव्हा वेळ 12 वाजलेली होती. थोडी तरी लाज वाटू दे. थोडी कृतज्ञता बाळगा. अमेरिकेकडून खेळणाऱ्या जसकरण मल्होत्रानेही कामरान अकमलला फटकारले आहे.

कामरान अकमलने मागितली माफी

कामरान अकमलला आपल्या वक्तव्यामुळे मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्याने लिहिले की, मला माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची माफी मागतो. माझे शब्द चुकीचे आणि अपमानास्पद होते. मी सर्व शीखांचा आदर करतो. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी माफी मागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT