T20 World Cup 2024 Match Fixing  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग? 'या' संघाच्या खेळाडूंना आले अनेक नंबरवरून कॉल

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील एका सामन्यावेळी केनियाच्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने अनेक नंबरवरून केले होते कॉल

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Match Fixing : युएसए आणि वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला आहे. वर्ल्डकपचे ग्रुप स्टेजमधील सामने सुरू असताना युगांडाच्या खेळाडूंशी मॅच फिक्सिंगच्या हेतूने संपर्क साधण्यात आला होता. याबाबतची तक्रार युगांडाच्या खेळाडूंनी आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटकडे केली होती.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार केनियाच्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने युगांडाच्या खेळाडूंशी अनेकवेळा संपर्क साधला. तो वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क करत होता. हा प्रकार गयाना येथील सामन्यावेळी घडला. आयसीसीच्या कडक अँटी करप्शन प्रोटोकॉलनुसार युगांडाच्या खेळाडूंनी आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले की युगांडाच्या खेळाडूंना मॅच फिक्सिंगसाठी संपर्क करण्याची गोष्ट आश्चर्यकारक नाही. असोसिएट देश हे मॅच फिक्सिंगसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. मात्र या प्रकरणात खेळाडूंनी आयसीसीकडे त्वरित संपर्क केला.

पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, 'युगांडाच्या क्रिकेटपटूंशी संपर्क करणं ही काही आश्चर्याची बाब नाही. मोठ्या संघापेक्षा असोसिएट नेशन हे मॅच फिक्सिंगसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. खेळाडूंनी आयसीसीला लगेचच हा संपूर्ण प्रकार आयसीसीला सांगितला.'

या घटनेमुळे आयसीसी अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी केनियाच्या माजी खेळाडूविरूद्ध अॅक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी इतर असोसिएट संघांना याबाबत कळवलं आहे.

आयसीसीचे नवे अँटी करप्शन नियम लागू

नव्या आयसीसी अँटी करप्शन नियमानुसार जर खेळाडूंनी त्यांना मॅच फिक्सिंगबाबत विचारणा झाल्यावर त्याची माहिती आयसीसीला देणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर तो गुन्हा समजला जातो. त्या खेळाडूला मॅच फिक्सिंग, बेटिंग, संघाच्या आतील माहितीचा दुरूपयोग, चौकशीत सहकार्य न करणे असे गुन्ह्यात दोषी धरलं जातं.

आयसीसीने 1 जून 2024 पासून हा नवा नियम लागू केला आहे. या नियमाअंतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या गैरव्यवहाराचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील लागू करण्यात आला आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT