Virat-Nabi 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20WC: भारत-अफगाणिस्तान मॅच फिक्स होती? नक्की काय आहे प्रकरण..

भारताचा अफगाणिस्तानच्या संघावर दणदणीत विजय | Fixed Match in Trending

विराज भागवत

भारताचा अफगाणिस्तानच्या संघावर दणदणीत विजय | Fixed Match in Trending

IND vs AFG, T20 World Cup: भारतीय संघाने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. सलामीवीर रोहित शर्मा (७४) आणि लोकेश राहुल (६९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १४० धावांची सलामी दिली. त्यानंतर हार्दिक पांड्या (३५*) आणि ऋषभ पंत (२७*) यांच्यात नाबाद ६३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने २१० धावांपर्यंत मजल मारली. हे लक्ष्य अफगाणिस्तानला पेलले नाही. करीम जनतच्या नाबाद ४२ धावा आणि कर्णधार मोहम्मद नाबीच्या ३५ धावांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानने २० षटकात ७ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यानंतर भारतीय चाहते खुश असताना एक वेगळीच चर्चा रंगल्याचे दिसून आली.

अफगाणिस्तानच्या संघाने मुद्दाम भारताविरूद्ध मोठा पराभव पदरी पाडून घेतला असा दावा काही ट्वीटर युजर्सनी केला. भारतीय संघासोबतची अफगाणिस्तानची मॅच फिक्स होती असाही काही लोकांनी आरोप केला. पाहा त्या संबंधीचे काही ट्वीट्स...

दरम्यान, भारताने अफगाणिस्तान विरूद्धच्या विजयानंतर आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. भारतीय संघाचे आता पुढील दोन सामने तुलनेने कमकुवत असणाऱ्या नामिबिया आणि स्कॉटलंडशी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT