Mitchell Marsh reacts on Gulbadin Naib hamstring injury
Mitchell Marsh reacts on Gulbadin Naib hamstring injury Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: '...माझ्या डोळ्यात पाणी आलं', गुलबदिन नैबच्या क्रॅम्पवर काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार?

प्रणाली कोद्रे

Mitchell Marsh on Gulbadin Naib Cramp: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत अफगाणिस्तान संघाने इतिहास घडवला. त्यांनी सुपर-8 स्पर्धेत आधी ऑस्ट्रेलिया आणि मग मंगळवारी (25 जून) बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. यामुळे मात्र ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपले.

जर बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केले असते, तर कदाचित ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचले असते; परंतु, अफगाणिस्तानने बांगलादेशला अवघ्या 8 धावांनी पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपवले.

दरम्यान, बांगलेदेशविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा अष्टपैलू गुलबदिन नैबने केलेल्या एका कृतीने अनेकांना बुचकाळ्यात पाडले, याबद्दलच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रतिक्रिया दिली आहे.

झाले असे की बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाची शक्यता असतानाच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी खेळ संथ करा, अशा अर्थाचा इशारा केला. यानंतर लेगचच स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या नैब पायात क्रॅम्प आल्याचे सांगत खाली झोपला.

त्यावेळी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानलाही काय झाले कळाले नाही, त्यामुळे तो नैबकडे विचारणाही करायला गेला. नैबवर उपचार होत असतानाच पावसाला सुरुवात झाली आणि खेळाडूंना आत जावे लागले. यानंतर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार बांगलादेशसमोर 19 षटकात 114 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

दरम्यान, नंतर नैबने गोलंदाजीही केली, तसेच तो सामना जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशनही करताना दिसला. त्यामुळे मात्र, त्याची दुखापत खरी होती की खोटी यावर बरीच चर्चा झाली. अनेकांच्या मते त्याने नाटक केले होते. त्यामुळे काहींनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली, तर काहींनी टीकाही केली.

नैबच्या याच कृतीबद्दल जेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्शला विचारण्यात आले, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियन मीडियाला उत्तर दिले की 'मी क्रिकेटच्या मैदानावर पहिलेली गमतीशीर घटनांपैकी एक होती. मी हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आले होते.

'अखेरीस सामन्याच्या शेवटी त्याचा फार काही परिणाम झाला नाही, त्यामुळे आपण त्यावर हसू शकतो. पण ते खूपच मजेशीर होतं आणि मस्त होतं.'

दरम्यान, आता टी20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी प्रवेश केला आहे.

अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी, तर भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका गुरुवारी पहाटे 6 वाजता चालू होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड सामना गुरुवारी रात्री 8 वाजता चालू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani Family Sangeet: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला धोनी, हार्दिकसह अनेक क्रिकेटपटूंही हजेरी, पाहा Video

Ashadhi Wari : दिंडीत चालणाऱ्या वृद्ध वारकऱ्यावर काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या जागीच ठार; बीडच्या तेलगाव परिसरातील घटना

Fawad Khan : 'ए दिल है मुश्किल'नंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा बॉलिवूडमध्ये कमबॅक ; 'या' अभिनेत्रीबरोबर करतोय काम

Alchohol Side Effects : दारू अन् एनर्जी ड्रिंक तुम्हाला बनवू शकतात 'गजनी'! संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

NEET-UG Counselling: नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट; पुढील नोटिसी येईपर्यंत काऊन्सलिंग स्थगित

SCROLL FOR NEXT