MS Dhoni Celebrating Friend's Birthday
MS Dhoni Celebrating Friend's Birthday Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

MS Dhoni: धोनीच्या साधेपणाची चर्चा! मित्राचा वाढदिवस त्याच्या घरी जाऊन केला साजरा, Video Viral

प्रणाली कोद्रे

MS Dhoni Viral Video: एमएस धोनी जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता नुकताच त्याच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या मित्राच्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्याचे दिसत आहे.

खरंतर धोनी हा त्याच्या शांत स्वभावाबरोबरच नम्र म्हणूनही ओळखला जातो. त्याचा सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही तसेच दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या मित्राच्या घरी गेल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत दिसणारे लोक त्याला चांगले ओळखत असल्याचेही लक्षात येत आहे. ते त्याला माही म्हणून बोलवताना दिसत आहे. तसेच त्याच्याशी एकदम साधेपणाने बोलताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये मित्र केक कापत असताना धोनी थोडी मस्तीही करताना दिसत आहे. तसेच धोनी मित्राला केक चारत असताना त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या धोनीच्या साधेपणाची सध्या चर्चा असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वीच म्हणजे 2020 मध्येच निवृत्त झाला आहे. पण असे असले तरी त्याने आयपीएलमध्ये खेळणे कायम केले आहे.

परंतु, आयपीएल 2024 पूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद सोडत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीतील कदाचीत हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याच्या चर्चा आहेत.

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत 538 सामन्यांमध्ये 17266 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 शतके आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना 829 विकेट्स घेतल्या, ज्यात 634 झेल आणि 195 यष्टीचीतचा समावेश आहे.

त्याने आयपीएलमध्ये 264 सामने खेळले असून 24 अर्धशतकांसह 5243 धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षण करताना 148 झेल आणि 42 यष्टीचीत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Update: ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या आज दाखल होणार पुण्यनगरीत, वाहतुकीत मोठे बदल, या पर्यायी मार्गांचा करा वापर

ISRO Chief : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याने जगाला चिंता, पण इस्रो प्रमुखांनी दिली खुशखबर; नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : फिट राहण्यासाठी किंग कोहली कोणता डाएट प्लॅन फॉलो करतो? जाणून घ्या एका क्लिकवर

Sharad Pawar: पंढरीच्या वारीत पायी चालणार का?, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्पष्ट

Maharashtra Breaking News Live Updates: मनमाड परिसरात पावसाला सुरूवात, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला काहीसा दिलासा

SCROLL FOR NEXT