MS Dhoni | Team India | T20 World Cup 2024
MS Dhoni | Team India | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

MS Dhoni: धाकधूक वाढलं होतं, बड्डे गिफ्ट साठी धन्यवाद.. थालाने टीम रोहितला दिल्या शुभेच्छा, काय म्हणाला धोनी ?

प्रणाली कोद्रे

MS Dhoni Post: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) इतिहास रचला. बार्बाडोसला झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. त्यामुळे रोहित शर्मा एमएस धोनीनंतर टी२० वर्ल्ड कप जिंकणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला.

दरम्यान विजेतेपदानंतर धोनीनेही स्पेशल पोस्ट केली आहे. त्याने वाढदिवसाचं शानदार भेट दिल्याबद्दल भारतीय संघाचे आभारही मानले. धोनीचा ७ जुलैला ४३ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक आठवडा आधीच भारतीय संघाने त्याला वर्ल्ड कप विजयाची भेट दिली आहे.

धोनीने भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा फोटो पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं की 'वर्ल्ड कप चॅम्पियन २०२४. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण तुम्ही शांत राहुन, स्वत:वर विश्वास ठेवून आणि तुम्ही करून दाखवलं.'

'मायदेशी असलेल्या आणि जगात जिथे कुठे असतील, त्या सर्व भारतीयांकडून तुमचे धन्यवाद की तुम्ही वर्ल्ड कप भारतात आणत आहात. अभिनंदन. अरे हा आणि वाढदिवसाची अमुल्य भेट दिल्याबद्दलही आभार.'

एमएस धोनीने यापूर्वी सर्वात पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप कर्णधार म्हणून उंचावला होता. तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर गेल्या ११ वर्षात भारताला एकदाची आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण अखेर ही प्रतिक्षा संपली आणि भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली.

अंतिम सामन्यात भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या. त्यामुळ भारताने ७ धावांनी विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate : 'दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव द्या, अन्यथा गाई-म्हशींसह मंत्रालयासमोर आंदोलन करणार'; शिवसेनेचा इशारा

Raju Shinde : राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ? बैठकीनंतर शिंदेंनी नाराजी केली उघड; म्हणाले, 'तेच' आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर...

Sonakshi Sinha : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने सोडलं मौन ; म्हणाली,"लग्न झाल्यावर..."

Manoj Jarange : ''सरकारने मला...'' शांतता रॅलीत मनोज जरांगेंना अश्रू अनावर; सांगितला १३ तारखेनंतरचा प्लॅन

'गोकुळ'ला आलेल्या 'त्या' निनावी पत्राच्या आधारे गुन्हे दाखल करा; औषध घोटाळ्याबाबत शौमिका महाडिक स्पष्टच बोलल्या

SCROLL FOR NEXT