T20 World Cup Namibia VS Oman sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

NAM vs OMA T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या तिसऱ्याच मॅचमध्ये रंगली सुपर-ओव्हर! रोमांचक सामन्यात नामिबियाचा विजय

Kiran Mahanavar

Namibia VS Oman T20 World Cup 2024: आज टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओमानचा संघ 19.4 षटकात 109 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर, नामिबियाचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण ओमान संघाने नामिबियाला कडवी झुंज दिली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा सलामीवीर मायकेल वॉन लिंगेन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर निकोलस डेव्हलिन आणि जॉन फ्रायलिंक यांनी चांगली फलंदाजी केली. निकोलसने 24 आणि फ्रायलिंकने 45 धावा केल्या. कर्णधार गेरहार्ड इरास्मसला केवळ 13 धावा करता आल्या. शेवटच्या चेंडूवर नामिबियाला विजयासाठी 2 धावांची गरज होती. पण संघ केवळ एक धावा करू शकला. अशा प्रकारे दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर झाली.

सुपर ओव्हरमध्ये नामिबियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 21 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये डेव्हिड वीसने 13 आणि कर्णधार गेरहार्ड इरास्मसने 8 धावा केल्या.

यानंतर डेव्हिड वीसने सुपर ओव्हरमध्ये नामिबियाच्या गोलंदाजीची जबाबदारीही घेतली. तिसऱ्या चेंडूवर त्याने नसीम कुशीची विकेटही घेतली आणि सुपर ओव्हरमध्ये केवळ 10 धावा दिल्या. अशा प्रकारे सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने सामना जिंकला. सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डेव्हिड वीसला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून टी-20 वर्ल्ड कपची शानदार सुरुवात केली.

12 वर्षांनंतर हे घडले...

2012 नंतर टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निर्णय होण्याची ही दुसरी वेळ आहे. 12 वर्षांपूर्वी 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पल्लेकेले येथे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता, जो कॅरेबियन संघाने जिंकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT