Oman vs Namibia Super Over Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: तब्बल 12 वर्षांनी सुपर-ओव्हर! ओमान-नामिबियापूर्वी यापूर्वी 'हे' तीन सामनेही झालेत 'टाय'

Pranali Kodre

T20 World Cup Super Over: टी20 वर्ल्ड कप 2024 चा थरार रविवारपासून (2 जून) सुरू झाला आहे. या स्पर्धेतील तिसऱ्याच सामना नाट्यमय झाला. ओमान आणि नामिबिया यांच्यात सोमवारी झालेल्या या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने बाजी मारली.

या सामन्यात ओमानचा संघ प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात 109 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर नामिबियालाही 20 षटकात 6 बाद 109 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने 6 चेंडूत बिनबाद 21 धावा केल्या, त्यानंतर 22 धावांचा पाठलाग करताना ओमानला 1 बाद 10 धावाच करता आल्या.

सुपर ओव्हर झालेले सामने

दरम्यान, टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर ओव्हर होण्याची घटना तिसऱ्यांदा घडली, तर तब्बल 12 वर्षांनी सुपर ओव्हर झाली. यापूर्वी 2012 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा सुपर ओव्हर झाली होती.

2012 साली श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी 174 धावा केल्यानंतर सुपर ओव्हर झाली होती, ज्यात श्रीलंकेने विजय मिळवला होता. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने 1 बाद 13 धावा केलेल्या, तर न्यूझीलंडला 1 बाद 7 धावाच करता आल्या होत्या.

त्यानंतर 2012 सालीच न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यातही सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात दोन्ही संघांनी 139 धावा केल्याने सामन्यात बरोबरी झाली होती. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्यात वेस्ट इंडिजने बिनबाद 19 धावा केल्या होत्या, तर न्युझीलंडला बिनबाद 17 धावाच करता आल्या होत्या.

बरोबरीत सुटलेले सामने

ओमान आणि नामिबिया हा टी20 वर्ल्ड कपमधील निर्धारित 20-20 बरोबरीत सुटलेला चौथा सामना होता. यापूर्वी 2012 मधील श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यांचाही समावेश आहे.

तसेच सर्वात आधी 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघात झालेला साखळी सामना बरोबरीत सुटला होता. त्यावेळी भारताने 20 षटकात 9 बाद 141 धावा केल्या होत्या, तर पाकिस्तानने 20 षटकात 7 बाद 141 धावा केल्या होत्या.

त्यामुळे बॉल आऊटने या सामन्यातील विजेता संघ निश्चित करण्यात आलेला. बॉल आऊटमध्ये भारताने विजय मिळवलेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT