Sybrand Engelbrecht announces retirement Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup मधून संघ बाहेर, स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा

Netherlands Cricket: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतून नेदरलँड्स बाहेर पडल्यानंतर त्यांच्या स्टार खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Pranali Kodre

Sybrand Engelbrecht announces retirement: टी२० वर्ल्ड कपमध्ये आता पहिली फेरी जवळपास संपली असून सुपर-८ मध्ये प्रवेश करणारे ८ संघ निश्चित झाले आहेत, तर १२ संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. या १२ संघांमध्ये नेदरलँड्सचाही समावेश आहे.

दरम्यान, नेदरलँड्सने शेवटपर्यंत सुपर-८ साठी प्रयत्न केले, मात्र बांगलादेशने त्यांना मागे टाकले. आता नेदरलँड्सचे आव्हान संपल्यानंतर त्यांचा स्टार खेळाडू सायब्रँड एंजलब्रेक्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जन्मलेल्या सायब्रँडने तिथेच क्रिकेटचे धडे घेतले. तो दक्षिण आफ्रिकेकडून २००८ साली झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळला. या स्पर्धेतही त्याने त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

मात्र, त्याला क्रिकेटमध्ये फारशी मोठी संधी मिळाली नाही, त्याने नंतर २०१६ साली त्याचे लक्ष फायनान्शिअल आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट या करियरमध्ये घातले. त्याने त्यावेळी क्रिकेटमधून निवृत्तीही घोषित केली. तो नेदरलँड्सला कामानिमित्त गेल्यानंतर तिथे त्याने वूरबर्ग सीसी कडून क्लब क्रिकेट खेळायला लागला. तिथे तो डच टॉपक्लास चॅम्पियनशीप २०२३ स्पर्धा जिंकला.

यानंतर २०२३ साली झालेल्या वनडे वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स पात्र ठरल्यानंतर सायब्रँडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. त्याची नेदरलँड्स संघात निवड झाली. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत ३०० हून अधिक धावा ठोकल्या. तो या स्पर्धेत नेदरलँड्सचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

त्याला २०२४ टी२० वर्ल्ड कपसाठीही नेदरलँड्सच्या संघात संधी मिळाली. तो या स्पर्धेतही नेदरलँड्सचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या स्पर्धेतही त्याचे क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय ठरले.

दरम्यान, टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये नेदरलँड्सला अखेरच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ८३ धावांनी पराभूत व्हावं लागलं. यानंतर सायब्रँडने निवृत्तीची घोषणा केली. ३५ वर्षीय सायब्रँडने १२ वनडे खेळताना ३८५ धावा केल्या, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना त्याने २८० धावा केल्या.

त्याने त्याच्या संपूर्ण कारकि‍र्दीत ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७ शतके आणि १० अर्धशतकांसह ३०६७ धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ७० सामन्यात १६६० धावा केल्या, तर ५७ टी२० सामन्यात ८४८ धावा केल्या. तसेच त्याने संपूर्ण कारकि‍र्दीत १०० हून अधिक विकेट्सही घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT