Kane Williamson - Trent Boult X/ICC
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: 'हा माझा शेवटचा वर्ल्ड कप', न्यूझीलंडच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं

Pranali Kodre

Trent Boult: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे सध्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा कारकिर्दीतील अखेरचा टी20 वर्ल्ड कप असेल, असे न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने स्पष्ट केले आहे.

ट्रेंट बोल्टने 2013 साली न्यूझीलंडसाठी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने गेल्या ११ वर्षात 2014, 2021, 2022 आणि आता 2024 असे चार टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळल्या आहेत. त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये 17 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. बोल्टने त्याच्या कारकि‍र्दीत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 60 सामने खेळले असून 81 विकेट्स घेतल्या आहेत.

बोल्ट न्यूझीलंडचा गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. पण त्याने 2022 मध्ये बोर्डाच्या वार्षिक करारातून आपले नाव कमी केले होते. तेव्हापासून तो न्यूझीलंडकडून मोजक्या स्पर्धा खेळताना दिसतो.

न्यूझीलंडने शुक्रवारी युगांडाला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 विकेट्सने पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बोल्ट म्हणाला, 'मी माझ्यावतीने सांगतो. हा माझा शेवटचा टी20 वर्ल्ड कप आहे. मला इतकेच सांगायचे आहे.'

दरम्यान, न्यूझीलंडसाठी टी20 वर्ल्ड कप 2024 मधील कामगिरी विसरण्यासारखी राहिली आहे. त्यांना वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभूत व्हावं लागल्याने या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे ते 2014 नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

त्यांच्या कामगिरीबद्दल बोल्टने निराशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'स्पर्धेची सुरुवात आम्हाला अपेक्षित अशी नक्कीच झाली नागी. हे स्वीकारणे कठीण आहे. पुढच्या फेरीत न जाण्याचे दु:ख आहे. पण कधीही देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, ही सन्मानाचीच गोष्ट असते.'

बोल्ट म्हणाला, 'ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना देशासाठी खेळण्याचा अभिमान आहे. गेल्या काही वर्षांत आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. दुर्दैवाने गेल्या दोन आठवड्यात आमची कामगिरी चांगली राहिली नाही, त्याचमुळे आम्ही सुपर-8 साठी पात्र ठरू शकलो नाही. पण असे असले तरी ड्रेसिंग रुममध्ये सध्या प्रतिभाशाली खेळाड़ू आहेत, ते नक्कीच पुढे चांगले खेळतील.'

यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांसाठी आव्हानात्मक परिस्थिती होती. याबद्दल बोल्ट म्हणाला, 'हो, आव्हानत्मक आहे, यात काहीच शंका नाही.'

'अनेक छोट्या धावसंख्या झाल्या. मी जगभरात क्रिकेट खेळलो आहे आणि वेगवेगळी परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण असते. पण मला वाटते हो यावेळी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली आहे. फलंदाजीसाठी खेळपट्टी फारशी चांगली नाही.'

न्यूझीलंडला आता यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी पापुआ न्यू गिनीविरुद्ध अखेरचा सामना खेळायचा आहे. हा बोल्टच्या कारकिर्दीतील न्यूझीलंडसाठीचा अखेरचा टी20 सामनाही ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT