Kane Williamson run out  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : केन विल्यमसन क्रिज सोडून फसला; हसन अलीचा रॉकेट थ्रो!

सुशांत जाधव

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने शारजाच्या मैदानातील पाकिस्तान विरुद्धच्या लढतीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात केली. पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानतंर कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो लयीतही दिसत होता. पण रन आउटच्या रुपात त्याने विकेट फेकली.

केन विल्यमसनने ड्वेन क्वॉन्वेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमली असे वाटत असताना न्यूझीलंडच्या 14 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर डाव बिघडला. पहिल्या षटकात 15 धावा खर्च करणाऱ्या हसन अलीच्या चेंडूवर विल्यमसनने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. हसन अली चपळाईन चेंडूवर आल्याचे पाहताच नॉन स्टाईकला असलेल्या क्वॉन्वेला नो असं म्हणत केन विल्यमसन मागे फिरला. पण हसन अलीने मिळालेल्या संधीच सोन करुन दाखवत डायरेक्ट थ्रोवर न्यूझीलंड कर्णधाराचा खेळ खल्लास केला.

केन विल्यमसनने 26 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि एक षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला तिशीचा आकडा पार करता आला नाही. डी मिचेल आणि क्वॉन्वे या दोघांनी संयुक्तरित्या 27 धावा केल्या. हीच न्यूझीलंडची सर्वाच्च धावसंख्या ठरली. गप्तिलच्या 17 आणि गेन फिलिप्सच्या 13 धावा वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी न्यूझीलंडचा संघ पहिल्याच सामन्यात निर्धारित 20 षटकात 8 बाद 134 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates: भाजपच्या पहिल्या यादीत 'लाडक्या बहिणी'चा हुकमी एक्का; गेम चेंजर ठरणार की..?

IND vs NZ Test: दीडशतकानंतर वॉशिंग्टन सुंदरला मिळालं बक्षीस! पुणे - मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात संधी

बॉलिवूडमधील या दोन बहिणी गैरसमजामुळे झाल्या होत्या कट्टर दुष्मन ; बहिणीच्या अखेरच्या क्षणीही भेटली नाही करीनाची आई

Vidhan Sabha जागांवरून मविआतील वाद विकोपाला? ठाकरे गट वेगळा निर्णय घेणार? Maharashtra Politics

BJP Candidates List : भाजपच्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतून दोन आमदरांचा पत्ता कट... 'या' दिग्गजांना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT