USA vs IND T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

USA vs IND : भारतानं तारलं मात्र युएसए, आयर्लंड मारणार; पाकिस्तान टीम इंडियाच्या विजयानं इतका का खूश झाला?

अनिरुद्ध संकपाळ

USA vs IND T20 World Cup 2024 : भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात युएसएचा 7 विकेट्स आणि 8 बॉल चेंडू राखून पराभव केला. भारताने या विजयाबरोबरच सुपर 8 मधील आपले तिकीट निश्चित केलं. भारताच्या या विजयाने पाकिस्तानला मात्र मोठा दिलासा मिळाला.

भारताने युएसएला 110 धावात रोखलं होतं. त्यानंतर हे आव्हान भारताने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानचा जीव भांड्यात पडला

टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करतोय. त्यांना युएसए आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या दोन पराभवांमुळे त्यांचे सुपर 8 मधील प्रवेश लटकला आहे. त्यांना भारत - युएसए सामन्यात काय होतं यावरही त्यांच गणित अवलंबून होतं.

युएसएला फक्त एक सामना जिंकायचा होता. मात्र भारताने युएसएला चांगल्या पद्धतीने मात दिल्याने पाकिस्तानचे आव्हान एक दिवस का असेना अबाधित राहिलंं आहे. मात्र असं असलं तरी युएसएने आयर्लंडला मात दिली तर पाकिस्तानचं सुपर 8 गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे.

पाकिस्तानला किती संधी?

ग्रुप A मध्ये भारतीय संघाने 6 गुणांसह सुपर 8 चं तिकीट नक्की केलं आहे. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे नेट रनरेट हे +1.137 इतके आहे. युएसए चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे नेट रनरेट हे +0.127 इतके आहे.

मात्र भारताने युएसएचा पराभव केला अन् पाकिस्तानने कॅनडाचा पराभव केल्यानंतर चित्र थोडं बदललं आहे. पाकिस्तानचं नेट रनरेट हे +0.191 इतकं झालं आहे. हे युएसएपेक्षा चांगलं नेट रनरेट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा वाढल्या आहेत. मात्र तर युएसएने आयर्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT