PAK vs CAN T20 World Cup New York Weather Update : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 22 वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानसाठी हा करो या मरोचा सामना आहे. जर त्यांनी हा सामना हारला किंवा तो रद्द झाला तर पाकिस्तानी संघाचे स्पर्धेतून बाहेर जाई. या कारणास्तव, सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही आणि संपूर्ण सामना पाहता येईल हे खूप महत्वाचे आहे.
पाकिस्तान संघाने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही. दोन सामन्यांत सलग दोन पराभवानंतर तो चौथ्या स्थानावर आहेत. टीम इंडिया दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर आहे तर यूएसए संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कॅनडाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकच्या स्वप्नावर अवकाळी पाऊस घालणार खोडा?
पाकिस्तानला सुपर-8 मध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना कॅनडाविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. यासोबत पूर्ण सामना व्हावा आणि पावसाने व्यत्यय आणू नये अशी त्यांची इच्छा असले.
जर आपण 11 जून रोजी न्यूयॉर्कमधील हवामानाबद्दल बोललो तर, आकाश ढगाळ राहू शकते. पावसाचा अंदाज नसला तरी ढगाळ वातावरण असू शकते. याचा फायदा पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा भारताविरुद्ध घेऊ शकतात.
पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा स्थितीत पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे खाते उघडेल आणि साखळी टप्प्यातील आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना केवळ तीन गुण मिळतील. त्यानंतर पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल. कारण अमेरिका आणि भारताचे आधीच चार गुण आहेत.
त्यामुळे सुपर-8 मध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला आपले दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. यानंतर, त्यांना प्रार्थना करावी लागेल की यूएसए संघ पुढचे दोन्ही सामने हरले पाहिजे. यूएसएला अजून भारत आणि आयर्लंड यांच्याशी सामना करायचा आहे आणि जर त्यांनी यापैकी कोणत्याही एका संघाचा पराभव केला. तर तो 6 गुणांसह सुपर-8 मध्ये पोहोचतील आणि पाकिस्तान बाहेर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.