Pakistan Spur 8 Qualification T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा बाजार गुंडाळणार; युएसए सामना न खेळताही जाऊ शकतो सुपर 8 मध्ये?

T20 World Cup 2024 Super 8 Qualification : फ्लोरिडाचं वातावरण बदलतंय, पाकिस्तानसाठी सुपर 8 मध्ये पात्र होण्यासाठी पुढेचे दोन सामने खूप महत्वाचे आहेत.

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Spur 8 Qualification T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील ग्रुप A मध्ये सुपर 8 साठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भारतीय संघ अव्वल स्थान गाठण्याच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र भारतासोबत दुसरा संघ कोण सुपर 8 साठी पात्र होईल याबाबत प्रचंड अनिश्चितता आहे. सध्या युएसए 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता ही जर - तरवर आली आहे. त्यात आता युएसए आपला चौथा सामना न खेळता देखील सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि युएसए हे आपले लीग स्टेजमधील शेवटचे सामने हे फ्लोरिडा येथे खेळणार आहेत. मात्र फ्लोरिडामधील हे सामने वॉश आऊट होण्याची शक्यता दाट आहे. जर पावसाने खेळ बिघडवला तर पाकिस्ताचे सुपर 8 चे गणित बिघडणार आहे.

पाकिस्तानचा बाजार गुंडाळणार?

श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील बुधवारी झालेला सामना पावसामुळे वॉश आऊट झाला. हा सामना फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर झाला होता. हा सामना एकही चेंडू न खेळता वॉश आऊट झाला.

याच स्टेडियमवर 16 जूनला पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. तर युएसए ग्रुप स्टेजमधील आपला शेवटचा सामना हा 14 जूनला फ्लोरिडामध्येच खेळणार आहे. फ्लोरिडामधील पुढच्या आठवड्यातील वातावरण पाहिलं तर प्रत्येक दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पाऊस बिघडवणार खेळ

जर पाकिस्तान आणि युएसए या दोघांचे सामने वॉश आऊट झाले तर पाकिस्तानला आपला बाजार ग्रुप स्टेजमधूनच गुंडाळावा लागणार आहे. युएसएला एक गुण मिळाल्याने त्यांची गुणसंख्या ही 5 होईल. त्यामुळे जरी त्यांनी भारताविरूद्धचा सामना गमावला तरी ते सुपर 8 साठी पात्र होतील.

पाकिस्तानला सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी युएसएने त्यांचे दोन्ही सामने हरणे गरजेचे आहे. जर पाकिस्तान आणि आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर ते सुपर 8 मधून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे फ्लोरिडाच्या पावसामुळे पाकिस्तानी संघाची झोप उडाली आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT