Rashid Khan - Rohit Sharma X/ACBofficials
क्रिकेट वर्ल्ड कप

Rashid Khan: बंबई से आया मेरा दोस्त! IND-AFG सेमी-फायनलमध्ये पोहोचताच राशीदची मन जिंकणारी पोस्ट, एकदा बघाच

India - Afghanistan: भारत - अफगाणिस्तान टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहचताच राशीद खानने केलेली स्पेशल पोस्ट व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील सुपर-८ फेरी मंगळवारी संपली. या फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला ८ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे.

यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. राशीदचे भारताशी आणि भारतीय क्रिकेटशी जवळचे नाते आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत त्याच्या मनात मोठा आदर आहे. हेच त्याने उपांत्य फेरी गाठल्यानंतर प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इंस्टाग्रामवरील पोस्टमधून दाखवून दिले.

खरंतर भारत आणि अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये एकाच ग्रुपमध्ये होते. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशही होते. मात्र, भारत आणि अफगाणिस्तानने या दोन्ही देशांना मागे टाकत ग्रुपमध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली.

यानंतर राशीदने रोहित शर्माबरोबरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यावर कॅप्शन लिहिले आहे की 'बंबईस आया मेरा दोस्त... सेमीफायनल'.

तसेच या फोटोच्या बॅकग्राऊंडला ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं वाजत आहे. राशीदच्या या पोस्टने अनेक चाहत्यांची मनं जिंकली असून ही पोस्ट व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये आमने-सामने आले होते, पण त्यावेळी भारताने अफगाणिस्तानला पराभूत केले होते.

आता जर भारत आणि अफगाणिस्तान यांनी उपांत्य फेरीचे सामने जिंकले, तर दोघांमध्ये अंतिम सामना होऊ शकतो. उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध, तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळायचा आहे.

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामना २७ जून रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ६ वाजता चालू होईल, तर भारत आणि इंग्लंड संघातील उपांत्य सामना २७ जून रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता चालू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT