Florida T20 World Cup 2024 ICC sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : पावसामुळे ICC गोत्यात...! तिकिटांचे पैसे परत दिले नाहीत तर कोर्टात खेचणार

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 : अमेरिकेत क्रिकेटच्या प्रसारासाठी आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा मार्ग स्वीकारला आणि या स्पर्धेत न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथे काही सामने आयोजित केले खरे; परंतु फ्लोरिडात भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्याचे परिणाम कदाचित आयसीसीला भोगावे लागू शकतात.

सामना झालाच नाही तर तिकिटांचे पैसे परत करा, असा आग्रह धरण्यात आला तर पैसे परत दिले नाहीत तर न्यायालयात खेचू, असा इशाहा स्थानिर वकील ब्रॉवर्ड पार्क यांनी संयोजकांना दिला आहे.

ब्रॉवर्ड पार्क यांच्या या इशाऱ्यानंतर आयसीसी सावध झाली आहे आणि विचार करून आम्ही काही तरी रक्कम परत देऊ, असे मोघम उत्तरे दिली जात आहेत. मात्र, अजून किती टक्के रक्कम परत करणार हे नक्की समजले नाही. भारताच्या रद्द झालेल्या सामन्याला १५ हजार प्रेक्षक हजर झाले होते.

भारताचे तीन साखळी सामने न्यूयॉर्कमध्ये तर एकमेव सामना फ्लोरिडात नियोजित होता, त्यामुळे उत्सुकता कमालीची वाढलेली आहे; परंतु पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता. सामना रद्द झाल्याची घोषणा केल्यावर भारतीय संघ व्यवस्थापनाने किमान संघातील चार खेळाडूंना मैदानात पाठवून प्रेक्षकांना अभिवादन करायला लावले असते आणि जमा झालेल्या लहान लहान मुलांना टोपी, कागद किंवा पोस्टरवर सह्या करून दिल्या असत्या तर निदान त्यांच्या निराशेवर मलम लावले गेले असते; पण असा विचार कोणीही केला नाही. भारतीय खेळाडू आपल्या क्रिकेट पाठीराख्यांना गृहीत धरतात, अशी निराशा व्यक्त करण्यात येत होती.

स्टॉकधारक रडकुंडीला

प्रेक्षकांपेक्षा जास्त नुकसान मैदानात खाण्याचे स्टॉल चढ्या भाडेदराने घेणाऱ्या व्यावसायिकांचे झाले आहेत. चार सामन्यांत मिळून १०% व्यवसाय झाला नसल्याचे फूड स्टॉल चालवणाऱ्या लोकांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. २०२४ टी-२० विश्वचषक पार पडेल आणि मग आयसीसी मोठ्या तोंडाने स्पर्धा यशस्वी कशी झाली, याचे वर्णन आकडेवारी देत सांगेल; पण प्रत्यक्ष काय चुका झाल्या यावर भाष्य करणार नाही.

विडींजमधील नियोजन जिकिरीचे

आता दुसऱ्या म्हणजेच सुपर ८ फेरीचे वेध लागले आहे. याच टप्प्यावर आयसीसीला सिंहावलोकन करायची नितांत गरज आहे. वेस्ट इंडीजमध्ये विश्वचषक भरवणे जिकिरीचे असते. टीव्ही प्रक्षेपण बघताना दिसायला सगळे सुंदर दिसत असले तरी विंडीज बेटांवर प्रवास करणे जिकिरीचे असते. अगोदरच या बेटांदरम्यान प्रवास फक्त विमानाने करता येतो. त्यातून आता स्थानिक विमान कंपन्या अगदी कमी झाल्या आहेत. लियाट नावाची जुनी विमान कंपनी कोविड काळात प्रचंड नुकसान होऊन बंद पडली. क्रिकेट रसिक असो वा पत्रकार असो सगळ्यांना कमी काळाच्या विमान प्रवासासाठीही मोठा तिकीटदर द्यावा लागतो.

अमेरिकन मंडळाला सहयजमानपद देताना मोठा धोका पत्करला गेला. आर्थिक पाठबळ भरपूर होते; परंतु जागतिक स्तरावरची क्रिकेट स्पर्धा अमेरिकेत भरवण्याचा अनुभव नव्हता. एकीकडे न्यूयॉर्कच्या खेळपट्टीने फलंदाजांना धारेवर धरले. खेळपट्टीवरून टीका खूप झाली; पण त्याचा चांगला परिणाम असाही झाला की कमी अनुभव असलेल्या संघांना नामांकित संघांना टक्कर देता आली. सामने रंगतदार झाले. फ्लोरिडात नेमका पावसाने घोळ घातला. नेपाळ-श्रीलंका, अमेरिका-आयर्लंड आणि भारत-कॅनडा सामने पावसाने रद्द केले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: पक्षांची ताकद अन् प्राबल्य...रात्री उशीरा 'वर्षा'वर कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? विधानसभेसाठी ठरला गेम प्लॅन?

Weekly Horoscope 2024 : साप्ताहिक राशिभविष्य (29 सप्टेंबर 2024 ते 5 ऑक्टोबर 2024)

Sunday Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा मकई टॉप सूप, नोट करा रेसिपी

भूमिकांचा अभ्यासू शोध..

Panchang 29 September: आजच्या दिवशी सूर्य देवांना केशरभाताचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT