T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताने पहिला सराव सामना जिंकला. लोकेश राहुल (५१) आणि इशान किशन (७०) या सलामी जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताने १८९ धावांचे आव्हान ६ चेंडू आणि ७ गडी राखून पार केले. त्याआधी जॉनी बेअरस्टो (४९), मोईन अली (४३) आणि लियम लिव्हिंगस्टोन (३०) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने १८८ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने १ षटक राखून हा सामना जिंकला. या सामन्याबद्दल बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने संघातील मॅचविनर खेळाडू कोण? याबद्दल आपलं मत स्पष्ट केलं.
"टीम इंडियाचा गेमचेंजर खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. मला खात्री आहे की ऋषभ पंत हा असा खेळाडू आहे जो आपल्या फटकेबाजीने सामन्याचा पूर्ण निकाल पलटवून टाकू शकतो. त्यामुळे मी जर संघातील निर्णय घेत असेन तर मी ऋषभ पंतला १४ षटके झाल्यावर लगेच फलंदाजीला पाठवेन. ऋषभ पंत किंवा हार्दिक पांड्या यांसारखे बडे फटके खेळणारे फलंदाज हे कायम त्याच कालावधीत फलंदाजीस पाठवायला हवेत. कारण त्यांच्या सामना संपवण्याची आणि विजय मिळवून देण्याची ताकद आहे", अशी प्रतिक्रिया लक्ष्मणने व्यक्त केली.
"शेवटच्या चार षटकांमध्ये ४० ते ५० धावांची गरज असण्याची परिस्थिती जेव्हा ओढवते तेव्हा असे खेळाडू उपयोगी ठरला. विश्वचषकात अशी परिस्थिती अनेकदा येऊ शकते. इंग्लंडविरूद्ध सराव सामना हा त्याच प्रकारचा होता आणि भारतीय खेळाडूंनी त्याचा योग्य वापर केला", असेही तो म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.