Rohit Sharma IND vs ENG : रोहित शर्माने इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात दमदार खेळी केली. त्याने 36 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. पॉवर प्लेमध्ये विराट अन् पंत लवकर बाद झाल्यानंतर रोहितने सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे पावसाच्या लपंडावात या दोघांनी दमदार फलंदाजी करत भारताचा मोमेंटम कायम राखला.
रोहित शर्माने या अर्धशतकी खेळीसोबतच कर्णधार म्हणून एक मोठा माईल स्टोन पार केला. रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहे. अशी कामगिरी करणारा पाचवा कर्णधार झाला आहे. यापूर्वी विराट कोहली, एमएस धोनी, मोहम्मद अझरूद्दीन, सौरव गांगुली या कर्णधारांनी असा कारनामा केला आहे.
विराट कोहली - 12883 - 2017-2022
एमएस धोनी - 11207 - 2007 -2017
मोहम्मद अझरूद्दीन - 8095 - 1989-1999
सौरव गांगुली - 7643 - 2000-2005
रोहित शर्मा - 5013* - 2022-present
याचबरोबर रोहित शर्माने आजच्या आपल्या 39 चेंडूत केलेल्या 57 धावात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. या षटकारांसोबतच टी 20 वर्ल्डकपमध्ये 50 षटकार मारणारा रोहित शर्मा हा ख्रिस गेलनंतरचा दुसरा फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेलने टी 20 वर्ल्डकपमध्ये 63 षटकार मारले आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने 20 षटकात 171 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माने 57 तर सूर्यकुमार यादवने 47 धावांची खेळी केली. त्यानंतर हे दोघे 73 धावांची भागीदारी रचून बाद झाले. हार्दिक पांड्याने देखील 13 चेंडूत 23 धावा करत भारताची धावगती स्लॉग ओव्हरमध्ये चांगली ठेवली. हार्दिकनंतर जडेजाने 17 तर अक्षरने महत्वाच्या 10 धावा करत भारताला 170 धावांच्या पार पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.