rohit sharma did mistake in t20 world cup-2024-final-against-south africa-giving-axar patel
rohit sharma did mistake in t20 world cup-2024-final-against-south africa-giving-axar patel 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs SA : रोहित शर्माच्या 'या' चुकीमुळे भंगले होते वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न…. मग अचानक फिरले टेबल अन्...

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup Final 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.

बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याचं क्षणभर वाटत होतं. या सामन्यात रोहित शर्माने एक मोठी चूक केली, ज्यामुळे संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. नंतर अचानक टेबल उलटले. पण कर्णधार रोहितची ती चूक काय होती?

शेवटच्या 6 षटकात आफ्रिकेला विजयासाठी 54 धावांची गरज होती. क्रीजवर उपस्थित डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन हे फिरकीपटू उत्तम खेळत होते. तत्पूर्वी, कुलदीप यादवने 14 व्या षटकात 14 धावा केल्या होत्या. आता भारतीय कर्णधार 15 वे षटक वेगवान गोलंदाजाला देईल, अशी अपेक्षा होती. हार्दिक पांड्यानेही फक्त 1 ओव्हर टाकली होती. मात्र, रोहित शर्मा पुन्हा एकदा अक्षर पटेलच्या दिशेने गेला, ज्याने 3 षटकांत 25 धावा दिल्या. क्लासेनने अक्षरच्या त्या षटकात एकूण 24 धावा ठोकल्या.

या षटकानंतर टीम इंडिया हा सामना गमावेल असे वाटत होते. कारण आता शेवटच्या 30 चेंडूत फक्त 30 धावा हव्या होत्या आणि डेव्हिड मिलर क्लासेनसोबत क्रीजवर होता. त्यानंतर डावाच्या 16व्या षटकात आलेल्या जसप्रीत बुमराहने केवळ 4 धावा दिल्या आणि आफ्रिकेवर दबाव वाढवला.

आता आफ्रिकन संघाला शेवटच्या 4 षटकात 24 चेंडूत 26 धावांची गरज होती. त्यानंतर रोहित शर्माने डावातील 17 वे षटक हार्दिक पांड्याला दिले, ज्यामध्ये सर्व टेबल फिरले. हार्दिकने वेगवान खेळी खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनला ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. हार्दिकने विकेट घेतली आणि षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या.

आता आफ्रिकेवर पुन्हा एकदा दडपण आले, जे दोन षटकांपूर्वी सामना सहज जिंकेल असे वाटत होते. त्यानंतर 18 व्या षटकात बुमराह आला आणि त्याने केवळ 2 धावा आणि 1 बळी घेतला, यामुळे सामना पुन्हा एकदा भारताच्या बाजूने झुकला.

आता 2 षटकात 20 धावा हव्या होत्या. डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर उपस्थित होता. त्यानंतर 19व्या षटकात अर्शदीप सिंगने केवळ 4 धावा खर्च केल्या आणि आता आफ्रिकेला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती.

डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिलरला बाद करण्यात सूर्यकुमार यादवच्या शानदार झेलचा मोठा वाटा होता. हार्दिकने या षटकात केवळ 8 धावा दिल्या आणि 2 बळीही घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jai Hindu Rashtra : आता खासदारांना जय फिलिस्तान म्हणता येणार नाही; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बदलले नियम

Lalkrishna Advani health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिली अपडेट

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! टीम इंडियाच्या शेड्यूलमध्ये थोडा ट्विस्ट; PM मोदींना भेटण्याचे ठिकाण बदलले

Benefits Of Vrikshasana : मानसिक अन् शारिरीक संतुलन राखण्यासाठी वृक्षासन उपयुक्त, जाणून घ्या सरावाची पद्धत आणि फायदे

Maharashtra Live News Updates : बॉलीवूडची 'मॉडर्न गर्ल' स्मृती विश्वास नारंग काळाच्या पडद्याआड; नाशिकमध्ये घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT