Rohit Sharma | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India: 'वेडेपणा...!' चाहत्यांची गर्दी पाहून मुंबईचा राजा रोहितही गहिवरला, BCCI ने शेअर केला ओपन बसमधील Video

Pranali Kodre

Rohit Sharma Video: भारतीय क्रिकेट संघाने २९ जूनला इतिहास रचला. बार्बाडोसला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी भारतीय संघाने उंचावली. अंतिम सामन्यात भारताने अवघ्या ७ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हा भारताचा दुसरा टी२० वर्ल्ड कप विजय ठरला.

मात्र, या विजयानंतर बार्बाडोसला असलेल्या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे भारतीय संघ ३ दिवस तिथेच अडकला होता. पण अखेर गुरुवारी (४ जुलै) भारतीय संघ मायदेशात परतला. मायदेशात परतल्यानंतर भारतीय संघाचं जंगी स्वागत झालं. हे स्वागत पाहून भारतीय संघ आधी गुरुवारी पहाटे दिल्लीत पोहोचला.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानतंर भारतीय संघ मुंबईत पोहचला. मुंबईत संध्याकाळी नरीमन पाँइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान भारतीय संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणूकीदरम्यान हजारोंच्या संख्येत चाहते रस्त्यावर उतरले होते. यावेळी भारतीय खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करताना चाहत्यांचा उत्साह भरभरून वाहत होता. हेच प्रेम पाहून रोहितही गहिवरला होता.

तो याबद्दल बोलताना म्हणाला, '२००७ वेगळी भावना होती. विजयी मिरवणूक दुपारी चालू झालेली, आता संध्याकाळ झाली आहे. मी २००७ कधीच विसरू शकत नाही, कारण तो माझा पहिला वर्ल्ड कप होता. पण हा वर्ल्ड कप थोडा वेगळा आहे आणि विशेष आहे. कारण मी संघाचं नेतृत्व करत होतो. त्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

'येथे वेडेपणा पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता येथे लोक किती उत्साही आहेत. यातून दिसते वर्ल्ड कप किती महत्त्वाचा आहे. फक्त आमच्यासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी. मी खूश आहे की आम्ही देशासाठी काहीजरी जिंकू शकलो.'

या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'जेव्हा देश आनंदाने नाचला आणि त्यांच्या हिरोबरोबर सेलीब्रेशन केले.'

या विजयी मिरवणूकीचा चाहत्यांबरोबरच खेळाडूंनी खूप आनंद लुटला. त्यांनीही अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT