Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग-11 मध्ये खेळणार चार ऑलराऊंडर? रोहित शर्माने केलं स्पष्ट

Pranali Kodre

Rohit Sharma on Team India Playing XI: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाला पहिला सामना बुधवारी (5 जून) आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना न्युयॉर्कमधील नवे स्टेडियम नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाच्या संयोजनाबाबत भाष्य केले आहे.

भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू आहेत, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. हे चारही खेळाडू महत्त्वाची भूमिका संघासाठी निभावू शकतात, त्याचमुळे त्यांचा पुरेपूर आणि योग्य वापर करण्याचा विचार संघव्यवस्थापन करणार असल्याचे रोहितने म्हटले आहे.

पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने अशीही शक्यता वर्तवली की कदाचीत चारही अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाऊ शकते.

रोहित म्हणाला, 'जर तुम्हाला संघात योग्य समतोल साधायचा असेल, तर तुम्हाला खूप अष्टपैलूंची गरज असते. वेगवान गोलंदाजीसाठी हार्दिक आणि दुबे हे अष्टपैलू आमच्याकडे आहेत, तर फिरकी गोलंदाजीसाठी जडेजा आणि अक्षर यांचे पर्याय आहेत.'

'या संपूर्ण स्पर्धेत या चौघांचा कसा वापर करायचा, याबाबत आम्ही विचार केला आहे आणि आम्ही त्यांना परिस्थितीनुसार वापरण्याचे ठरवले आहे. या चौघांचा उपयोग कराय करायचा याच्यावर आमचे लक्ष आहे.'

'टी२० क्रिकेटमध्ये अष्टपैलू किती मोठी भूमिका बजावू शकतात हे आपण पाहिलेच आहे. फक्त टी२० क्रिकेटमध्येच नाही, तर सर्वच प्रकारात. बाकी कोणत्याही खेळाडूपेक्षा त्यांची भूमिका मोठी असते.'

रोहित पुढे म्हणाला, 'या चारही खेळाडूंना कसे वापरायचे हे महत्त्वाचे आहे. मी म्हटलो तकी मला माहित नाही की आम्ही या चौघांना एकत्र खेळवू शकू की नाही, पण जर खेळवू शकलो, तर खूप चांगले होईल. जरी असं नाही झालं, तरी आम्हाला वेगळा मार्ग शोधावा लागेल.'

रोहितने फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले. त्याने न्युयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या भारताच्या सराव सामन्यात आणि श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामन्यात फिरकीपटूंची कामगिरी चांगली झाल्याचे सांगितले. त्यामुळे तो म्हणाला की संघासाठी योग्य संमिश्रणाचा विचार करावा लागेल.

याशिवाय रोहित असंही म्हणला, एकत्र संघ म्हणून खेळण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. तसेच त्याने न्युयॉर्कमध्ये पहिल्यांदाच खेळण्याबद्दल उत्सुक असल्याचेही म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT