IND vs NZ: भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडचाही पराभव केला. त्यामुळे भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सामना अतिशय रंगतदार होणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. विराट कोहलीने नेहमीप्रमाणे नाणेफेक गमावली. न्यूझीलंडच्या विल्यमसनने भारताला फलंदाजी दिली. इशान किशनला सूर्यकुमार यादवच्या जागी संघात स्थान मिळाल्यामुळे तो राहुलसोबत ओपनिंगला आला. त्याने एक चौकार मारला पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या रोहितवर पाकिस्तानविरूद्ध झालेली नामुष्कीच ओढवणार होती. पण त्याला जीवनदान मिळाले.
रोहित शर्मा इशान किशन बाद झाल्यानंतर मैदानात आला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला त्याचाच सहकारी ट्रेंट बोल्ट याने पहिला चेंडू बाऊन्सर टाकला. रोहितला कदाचित या बाऊन्सरची कल्पना होती. त्यामुळे त्याने तो चेंडू हवेत टोलवला. पण अपेक्षित जोर न मिळाल्यामुळे चेंडू फिल्डरच्या हातात गेला. झेल अतिशय सोपा असल्याने तो पकडला जाईल अशी अपेक्षा होती. पण फिल्डरच्या हातून झेल सुटला आणि हिटमॅनसह भारतीय फॅन्सचा जीव भांड्यात पडला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. आज त्याला झेल सुटल्यामुळे त्याची तशीच हालत होण्यापासून रोहित बचावला.
पाहा व्हिडीओ-
दरम्यान, रोहित शर्माला शून्यावर जीवदान मिळालं होतं. पण त्याला मोठी खेळी उभारता आली नाही. १४ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार लगावत त्याने १४ धावा काढल्या. फिरकीपटू इश सोढीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याला माघारी परतावे लागले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.