Rohit Sharma Virat Kohli Rahul Dravid Farewell
Rohit Sharma Virat Kohli Rahul Dravid Farewell sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND VS SA : 'हा' निरोप दीर्घकाळ स्मरणात राहील! रोहित, कोहली अन् राहुल द्रविड यांच्या एका युगाचा अंत....

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup Final : प्रत्येक खेळाडूला एकदा तरी जगभरात आपल्या डंका वाजला पाहिजे अशी इच्छा असते, जर तो फलंदाज असेल तर त्याने भरपूर धावा केल्या पाहिजेत, जर तो गोलंदाज असेल तर त्याने जास्तीत जास्त विकेट्स काढल्या पाहिजेत… पण ट्रॉफी मिळेपर्यंत क्रिकेटपटूची कारकीर्द अपूर्ण असते.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकून हा दुष्काळ संपवला. असे नाही की या दोन दिग्गजांनी यापूर्वी ट्रॉफी जिंकली नाही. रोहित हा 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा एक भाग होता तर विराट कोहलीने 2011 चा वर्ल्ड कप जिंकला होता...पण त्यावेळी हे दोन्ही खेळाडू खूपच युवा होते.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी हे टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद खूप खास आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे बक्षीस आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा केला आहे. यासोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडचा टीम इंडियाचा कार्यकाळही संपला आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही महापुरुषांचा निरोप दीर्घकाळ स्मरणात राहील.

2021 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी स्वीकारली, तर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला.

या तिन्ही वरिष्ठ खेळाडूंनी मिळून भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता, बहुतेक वेळा त्यांना निराशेचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही.

2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचे स्वप्न भंगले होते. जेव्हा एखादा संघ सलग अनेक स्पर्धा हरतो तेव्हा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे मनोबल खचते आणि संघ व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण भारतीय क्रिकेटमध्ये असे घडले नाही.

बोर्डाने तोच कर्णधार, तोच प्रशिक्षक आणि तेच खेळाडू यावर विश्वास व्यक्त केला आणि या विश्वासावर ते सर्वजण खरा राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT