टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना अगदी रंगतदार झाला. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली आणि वनिंदू हसरंगा याची विक्रमी हॅटट्रिक व्यर्थ ठरली. श्रीलंकेचा जादूई फिरकीपटू हसरंगा (Wanindu Hasaranga) ने हॅटट्रिक करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर आणले होते.
16 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेने 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 102 धावा लावल्या होत्या. श्रीलंकेनं दिलेले आव्हान ते सहज पार करतील असेच दिसत होते. मात्र 18 व्या षटकानंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था 6 बाद 118 अशी झाली. हसरंगाने दोन ओव्हरमध्ये हॅटट्रिक पूर्ण करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण श्रीलंकन संघाला विजय मिळाला नाही.
15 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हसरंगाने मार्करमला बाद केले. मार्करमने बॅकफूटवर जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण गूगली टाकून हसंरगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. 17 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर कर्णधार तेम्बा बवुमा निसंकाच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रेटोरिसला बाद करत हसरंगाने हॅटट्रिक पूर्ण केली.
टी-20 वर्ल्ड कपमधील तिसरी हॅटट्रिक
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवणारा हसरंगा हा तिसरा गोलंदाज ठरलाय. 2007 च्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या ब्रेटलीने हॅटट्रिकचा कारनामा केला होता. यंदाच्या हंगामातच दुसऱ्या हॅटट्रिकची नोंद झाली होती. आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफरने नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली होती. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच हंगामात दुसरी हॅटट्रिक बघायला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असा क्षण कधीच अनुभवायला मिळाला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.