Sachin Tendulkar on India close win over Pakistan sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak : नवा खंड निकाल मात्र तोच... सचिननंही पाकिस्तानची खेचली

Sachin Tendulkar on India close win over Pakistan : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानसोबत खेळलेला सामना 6 धावांनी जिंकला आहे.

Kiran Mahanavar

Sachin Tendulkar on Team India Win vs Pak : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानसोबत खेळलेला सामना 6 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात जेव्हा भारतीय संघ 119 धावांवर ऑलआऊट झाला तेव्हा रोहित आणि कंपनी हा सामना जिंकेल असे क्वचितच कोणाला वाटले असेल.

पण, भारतीय गोलंदाजांनी आपली ताकद दाखवत पाकिस्तानला 113 धावांपर्यंत रोखले. त्यामुळे भारताने 6 धावांनी अत्यंत विजय नोंदवला आहे. या विजयानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि पाकिस्तानची थोडी खेचली आहे.

महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, "भारत विरुद्ध पाकिस्तान, नवा खंड, मात्र निकाल तोच. टी-20 हा फलंदाजांचा खेळ असेल मात्र न्यूयॉर्कमध्ये गोलंदाजांनी नजरेत भरणारी कामगिरी केली. थरारक सामना! जबरदस्त वातावरण होतं आणि अमेरिकेत आपल्या खेळाचं जबरदस्त सादरीकरण झालं. भारताचं अभिनंदन.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीला आलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. प्रथम विराट 4 धावांवर बाद झाला, त्यानंतर रोहितने 13 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. या खराब सुरुवातीनंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी डाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र नसीम शाहने 20(18) धावांवर अक्षरला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला.

मग फलंदाज आले आणि गेले. सूर्यकुमार यादव 7, शिवम दुबे 3, हार्दिक पंड्या 7, रवींद्र जडेजा 0, अर्शदीप सिंग 9, मोहम्मद सिराज 7 धावा करून बाद झाले. भारताकडून ऋषभ पंतने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 31 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. अशाप्रकारे पाकिस्तान 19 षटकांत 119 धावांवर सर्वबाद झाला.

भारताने दिलेल्या 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात भारतापेक्षा चांगली झाली. आणि न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर आता भारताला जिंकणे अशक्य होईल, असे वाटत होते. पण, भारतीय गोलंदाजांनी हार मानली नाही आणि भारताचा विजय झाला. जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली, ज्यात त्याने 14 धावांत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 24 धावा देऊन 2 बळी घेतले. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी त्यांच्या खात्यात 1-1 विकेट नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT