Sachin Tendulkar  ESAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

Sachin Tendulkar : क्रिकेटचा तू खरा चॅम्पियन... मास्टर ब्लास्टरने रोहित अन् विराटसाठी केली भावनिक पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar T20 World Cup 2024 : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत तब्बल 17 वर्षांनी टी 20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. यादरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.

यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या दोघांसाठी एक भावनिक पोस्ट केली. संघाला विजेतेपदापर्यंत पोहचवल्याबद्दल रोहितचे कौतुक केलं तर विराटच्या फायनलमधील खेळीची स्तुती केली.

सचिन तेंडुलकर रोहितबद्दल म्हणाला की, 'मी तुझी युवा खेळाडू के वर्ल्डकप विनिंग कॅप्टन हा आश्वास प्रवास जवळून पाहिला आहे. तुझी कमिटमेंट आणि अद्वितीय गुणवत्ता यामुळे देशाचा गौरव वाढला आहे. टी 20 वर्ल्डकप जिंकणे ही तुझ्या टी 20 कारकिर्दीची योग्य सांगता आहे.'

सचिन विराट कोहलीबद्दल म्हणाला की, 'तू या खेळाचा खरा चॅम्पियन आहेस. तुला या स्पर्धेत फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र शेवटच्या सामन्यात तू सिद्ध करून दाखवलस की तू या जनरेशनचा सर्वात चांगला क्रिकेटपटू आहेस.

सहा वर्ल्डकप खेळून विजेतेपदला गवसणी घालणे काय असते हे मला माहिती आहे. तू दुसऱ्या फॉरमॅटमध्ये भारताला अशाच मॅचेस जिंकून देशी अशी आशा आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT