क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

प्रणाली कोद्रे

Sanjay Manjrekar on Virat Kohli: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (29 जून) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. बार्बाडोसला झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला.

या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली होती, त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र आता त्याला सामनावीर म्हणून निवडण्यावर संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

अंतिम या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. पण सुरुवातीच्या तीन विकेट्स भारताने 34 धावांवरच गमावल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत विराटने अक्षर पटेल (47) आणि शिवम दुबे (27*) यांच्याबरोबर अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या होत्या.

त्याने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तो 19 व्या षटकात बाद झाला होता. त्याच्या या खेळीमुळे भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या होत्या.

मात्र नंतर 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच त्याला डेव्हिड मिलरचीही साथ मिळाली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होते.

त्यांना एका क्षणी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. मात्र अखेरच्या 4 षटकात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कमागिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या.

दरम्यान, सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की विराट खूप धीम्या गतीने खेळला, ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता, त्याला गोलंदाजांनी वाचवलं.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले, 'विराटच्या त्या खेळीनंतर हार्दिक पांड्या, जो एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला फक्त दोन चेंडू खेळण्यासाठी मिळाले. त्यामुळे मला वाटते की भारताची फलंदाजी चांगली झाली, पण विराट कोहलीने खेळलेल्या खेळईने भारताला अडचणीत आणले होते. गोलंदाजांनी शेवटी विजय खेचून आणेपर्यंत जी परिस्थितीत होती, ती हेच सिद्ध करते.'

मांजरेकर पुढे म्हणाले, 'भारतीय संघ पराभवाचा उंबारठ्यावर होते, 90 टक्के संधी दक्षिण आफ्रिका संघाला जिंकायची होती. पण शेवटी झालेला बदलाने विराट कोहलीच्या खेळीला वाचवले. त्याने जवळपास अर्धा डाव 128 च्या स्ट्राईक रेटने खेळला होता. माझ्यासाठी सामनावीर एखादा गोलंदाज झाला असता, कारण त्यांनीच विजयश्री खेचून आणली.'

दरम्यान, भारताकडून या सामन्यात गोलंदाजीत हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

Chicken Tikka Pizza Recipe: बर्थडे बॉय एम एस धोनीला आवडतो चिकन पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

Nashik News : खासदारपदाची शपथ घेऊन भगरे सर विद्यार्थ्यांच्या भेटीला; थेट वर्गात जात साधला संवाद

Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT