Sourabh Netavalkar T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Sourabh Netavalkar : मन उधाण वाऱ्याचे... पाकिस्तानला रडकुंडीला आणलेल्या सौरभ नेत्रावळकरचा स्विंग अन् सूरही एक नंबर

अनिरुद्ध संकपाळ

Sourabh Netavalkar T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये यजमान युएसएने एक मोठा उलटफेर केला. त्यांनी पाकिस्तानसारख्या तगड्या संघाला सुपर ओव्हरमध्ये मात देत मोठा धक्का दिला. युएसएच्या या विजयात मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरचा सिंहाचा वाटा ठरला. त्यानं सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये 18 धावा डिफेंड करत युएसएला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

कधीकाळी भारताच्या 19 वर्षाखालील संघाकडून खेळलेल्या आणि मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेला सौरभ हा मल्टी टास्कर आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. याचबरोबर तो वाद्य वाजवण्यात आणि गाणं गाण्यात देखील तरबेज आहे. त्याचा मन उधाण वाऱ्याचं हे मराठी गाणं म्हटलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सौरभ नेत्रावळकरचा जन्म हा मुंबईत 1991 साली झाला होता. तो 2013 पर्यंत भारतातच होता. त्यानंं 2010 मध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते. त्यानंतर त्यानं मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा एक सामना देखील खेळला. क्रिकेटप्रमाणेच सौरभ नेत्रावळकर अभ्यासात देखील हुशार होता. त्यानं सॉफ्टवेअर इजिनिअरिंग पूर्ण केलं. अन् पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला.

मात्र अमेरिकेत देखील त्याने क्रिकेटची आपली आवड जोपासली. आता तो युएसए संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याने 2019 ते 2021 या दरम्यान 27 आंतरराष्ट्रीय सामन्यात युएसएचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली युएसएने 11 सामन्यात विजय अन् 15 सामन्यात पराभव पाहिला.

डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने 48 वनडे सामन्यात 73 विकेट्स घेतल्या आहेत. तर 29 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT