Suryakumar Yadav | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024: कॅच घेताना सूर्याचा पाय बाऊंड्रीला लागला होता? दक्षिण आफ्रिकेच्याच दिग्गजाने दिलं उत्तर

Suryakumar Yadav Catch: टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने बाऊंड्री लाईनजवळ महत्त्वाचा झेल घेतला होता. पण त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Suryakumar Yadav Catch in T20 WC Final: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. बार्बाडोसला शनिवारी (२९ जून) झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आणि टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

दरम्यान, या सामन्याच्या अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल अत्यंत महत्त्वाचा ठरला. मात्र त्याच्या या झेलावर काहींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिका करत असताना शेवटच्या षटकात त्यांना १६ धावांची गरज होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर फलंदाजी करत होता. त्याने हार्दिक पांड्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोरदार शॉट खेळला.

मात्र त्यावेळी बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या सूर्यकुमारने तो चेंडू झेलला, परंतु नियंत्रण सुटत असल्याने तो चेंडू त्याने पुन्हा वर फेकत बाऊंड्री लाईनवरून बाहेर येत पकडला. त्यामुळे मिलरला २१ धावांवर विकेट गमवावी लागली. ही विकेट अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे भारताला विजय मिळवणं सोपं गेलं.

दरम्यान, या सामन्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये बाऊंड्रीच्या दोरखंडाला सूर्यकुमारचा धक्का लागल्याचा दावा करण्यात आला.

याबद्दल शॉन पोलॉक त्याची प्रतिक्रिया देत असतानाचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने सूर्यकुमारचा झेल योग्य होता असे म्हटले आहे. पोलॉक म्हणाला, 'झेल योग्य होता. कुशन कदाचीत हालली असेल, पण ते खेळाच्या ओघात होतं. सूर्या कुशनवर उभा राहू शकत नव्हता. त्याने त्याचे शानदार कौशल्य दाखवले.'

दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार सूर्याचा पाय कुशनला लागला असेल, पण बाऊंड्रीच्या दोरखंडाला नाही. आयसीसीच्या नियमातील कलम 19.3 नुसार जर मैदानाची सीमा चिन्हांकित करण्यासाठी वापरलेली वस्तू कोणत्याही कारणास्तव हालली किंवा विस्कळीत झाली, ती सीमा तिच्या मूळ जागीच असल्याचे समजले जाते.

तसेच कलम 19.3.2 नुसार सीमा चिन्हांकित केलेली वस्तू हालल्यानंतर शक्य तितक्या लवकर तिच्या मूळ जागेवर ठेवण्यात यावी. जर खेळ सुरू असेल, तर बॉल डेड झाल्यानंतर हे लगेचच केले जावे.'

अंतिम सामन्यात भारताने दिलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 8 बाद 169 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT